(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nandurbar Accident : वाहन चालवताना चालकाला हृदयविकाराचा झटका, गाडीवरील नियंत्रण सुटलं अन्...
Nandurbar Accident News : वाहन चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा जोरदार झटका बसल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे भीषण अपघाताची घटना नंदुरबारमध्ये घडली आहे.
नंदुरबार : सध्या हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता नंदुरबारमधून (Nandurbar) एक धक्कादायक घटना घडली आहे. वाहन चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा जोरदार झटका बसला आहे. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील जी जे 26 ए ई 5786 या क्रमांकाची कार नंदुरबारजवळून जात असताना वाहनचालकाला चालत्या गाडीतच ह्रदयविकराचा झटका बसला. यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने रस्त्यावरील चौघांना जोरदार धडक दिली.
अपघातात दोघांचा मृत्यू तर दोन जखमी
या अपघातमध्ये यात एका साठ वर्षीय भंगार विक्रेता आणि आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर रस्त्याने पायी जाणारे आई आणि मुलगा देखील गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच नंदुरबार पोलिसांना घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
युक्तिवाद करताना वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
दरम्यान, नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद करताना वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिवाणी प्रकरणावर जिल्हा न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना वकील तलत इक्बाल कुरैशी (Talat Iqbal Qureshi) यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. तेव्हा न्यायाधीश एस. बी. पवार (S B Pawar) यांनी त्यांना त्यांच्या खासगी गाडीतून तातडीने रुग्णालयात (Hospital) नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
इतर महत्वाच्या बातम्या