Pune Accident Update: कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट; 'लाडोबा'ला RTOने दिले धडे, रोड सेफ्टी प्रोग्राम ट्रेनिंग अन्...
Kalyani Nagar accident Update : रोड सेफ्टी प्रोग्राम ट्रेनिंगमध्ये अपघातातील तरूणाला वाहतुकीची नियमावली, वाहन चालवताना घ्यायची काळजी, आरटीओकडून कशी कारवाई केली जाते, या सारख्या अनेक गोष्टी यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या.
Kalyani Nagar accident Update : पुण्यातील कल्याणीनगर भागात काही दिवसांपुर्वी झालेल्या भीषण अपघाताची चर्चा राज्यासह देशभरात सुरू आहे. याच पुण्यातील कल्याणीनगर अपघात (Kalyani Nagar accident) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपी तरुणाला आरटीओने धडे दिल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन तरुणाला रोड सेफ्टी प्रोग्राम ट्रेनिंग देण्यात आली आहे. वाहतुकीची नियमावली, वाहन चालवताना घ्यायची काळजी, आरटीओकडून कशी कारवाई केली जाते, या सारख्या अनेक गोष्टी यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या. अल्पवयीन तरुणाला धडे देताना प्रचंड गुप्तता पाळण्यात आली आहे. (Kalyaninagar accident case update Road Safety Program Training given by RTO to Juvenile accused)
अल्पवयीन तरुणाला शिक्षा म्हणून 300 शब्दांचा निबंध लिहण्यासोबत तसेच वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय सोबत काम करण्याच्या अटी शर्तीवर जामीन दिला होता. कल्याणीनगर येथे 19 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाच्या भरधाव ‘पोर्शे’ कारच्या धडकेत एक तरूण आणि एका तरूणीचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं.
नेमकं काय घडलं?
कल्याणीनगर (Kalyani Nagar accident Update) येथे 19 मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने ‘पोर्श’ कार भरधाव चालवून दुचाकीस्वार सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण-तरुणींना उडविले होते. त्यामध्ये या तरुण-तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला होता. मुलाला 15 तासांत जामीन देण्यात होता. यामुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
अल्पवयीन मुलाचेच नव्हे तर त्याच्या दोन मित्रांचेही बल्ड रिपोर्ट बदलले
ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्याच्या इतर दोन मित्रांचे देखील रक्ताचे नमुने बदलल्याची माहिती आता समोर आली आहे. एवढेच नाही तर त्यासाठी अल्कोहोल नसलेल्या कापसाचा वापर करण्यात आला असून, थेट सीएमओ (मुख्य वैद्यकीय अधिकारी) अधिकार्याच्या रेस्ट रुममध्ये हे रक्त नमुने बदलण्यात आले आहेत.
पोर्शे अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालवावेत, पोलीस आयुक्तांची मागणी
कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात (Kalyani Nagar accident Update) प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पोर्शे अपघात प्रकरणात येरवडा पोलीस ठाण्यात अपघाताच्या मूळ गुन्ह्यासह अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट करणे आणि चालकावर दबाव आणून खोटा जबाब द्यायला लावणे, त्याला डांबून ठेवणे, याप्रकरणी अन्य दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पोर्शे मोटारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सात आरोपींविरोधात न्यायालयात 900 पानांचे आरोपपत्र नुकतेच दाखल करण्यात आले आहे.