अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्यावर युवक काँग्रेसचा मोर्चा, ऊसाला प्रतिटन 3200 रुपये दर देण्याची मागणी
ऊसदरासाठी युवक काँग्रेसच्या वतीनं भाजप नेते आणि खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्यावर (Bhaurao chavan Cooperative Sugar Factory) रुमने मोर्चा काढण्यात आला.
Congress March News : ऊस दराच्या (Sugarcane rate) मुद्यावरुन नांदेड (Nanded) जिल्ह्यात युवक काँग्रेस (Youth Congress) आक्रमक झाली आहे. ऊसदरासाठी युवक काँग्रेसच्या वतीनं भाजप नेते आणि खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्यावर (Bhaurao chavan Cooperative Sugar Factory) रुमने मोर्चा काढण्यात आला. यावेळी ऊसाला प्रतिटन 3200 रुपये भाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासह अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्यांवर तोडगा न काढल्यास सभेत जाब विचारु असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांनी दिलाय.
ऊसदरासह 'या' आहेत प्रमुख मागण्या
अर्धापुर तालुक्यातील देगांव इथं अशोक चव्हाण यांचा भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्यावर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रुमने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून ऊसाला प्रतिटन 3200 रुपये इतका भाव देण्यात यावा, 14 महिनांच्या आत ऊसतोड झालीच पाहीजे, उसतोड झाल्याच्या पंधरा दिवसांच्या आत बिलाचे पैसे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात यावेत, कारखान्यावर 2 वर्षांपेक्षा अधिक काळ नोकरी करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना पर्मनंट करण्यात यावे, मागील थकीत बिल तात्काळ देण्यात यावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाऊराव सहकारी कारखान्यासमोर प्रचंड घोषणाबाजी देखील करण्यात आली. खबरदारी म्हणून पोलिसांच्या वतीने कारखान्याच्या चहुबाजूने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ऊसाला 3200 रुपये भाव न दिल्यास सभेत कारखान्याच्या चेअरमनला जाब विचारु
जर ऊसाला 3200 रुपये भाव दिला नाही तर सभेत कारखान्याच्या चेअरमनला जाब विचारु तसेच गावत येण्यासाठी मज्जाव करु असा इशारा बालाजी गाटे यांनी दिला आहे. कारखान्याने तुमचा ऊस जाणार नाही असं सांगून शेतकऱ्यांना मोर्चाला येऊ दिलं नसल्यचा आरोपही युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांनी केला आहे.
कारखान्याने शेतकऱ्यांची दिशाभूल केलीय
भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. त्यांच्या मेहनतीचा पैसा दाबून ठेवत आहे. हा कारखाना फक्त 2500 रुपयांचा दर देत असल्याचे बालाजी गाढे म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने 3000 ते 3500 रुपये दर देत आहेत. पण हा कारखाना शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारत असल्याचे बालाजी गाढे म्हणाले. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कारखाना प्रशासनाच्या एकाही संचालकाला गावात येऊ देणार नाही. सभेत त्यांना जाब विचारु असा इशारा बालाजी गाठेंनी दिला.
महत्वाच्या बातम्या: