एक्स्प्लोर

ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी

Russian Crude Oil : भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादलं आहे. तरी देखील भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवलीय

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावलं होतं. त्यानंतर रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादलं. म्हणजेच अमेरिकेनं भारतावर एकूण 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफचा भारत रशियाकडून तेल खरेदीवर परिणाम झाला नसल्याचं पाहायला मिळतं. कारण, गेल्या काही महिन्यात भारतानं रशियाकडून विक्रमी तेल खरेदी केली आहे. नोव्हेंबरमध्ये भारताची रशियाकडून तेल खरेदी 4 टक्क्यांनी वाढून  2.6 अब्ज यूरो पर्यंत पोहोचली आहे. 

चीननंतर भारत रशियन तेलाचा मोठा खरेदीदार

यूरोपियन रिसर्च सेंटर सीआरआयनं एका रिपोर्टमध्ये म्हटलं की रशियाकडून कच्च्या तेल खरेदीच्या बाबत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक नोव्हेंबर महिन्यात लागतो. भारतानं रशियाकडून ऑक्टोबर महिन्यात 2.5  अब्ज यूरोचं कच्चं तेल खरेदी केलं होतं. नोव्हेंबरमध्ये रशियाच्या एकूण तेल निर्यातीपैकी 47 टक्के निर्यात चीनला, 38 टक्के भारताला, 6 टक्के तुर्की आणि 6 टक्के यूरोपियन यूनियनला केलं आहे. 

सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरनं म्हटलं नोव्हेंबर महिन्यात भारताची रशियाकडून तेल आयात ऑक्टोबरच्या तुलनेत 4 टक्क्यांनी वाढली आहे. ही गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक आयात आहे. डिसेंबरमध्ये तेल खरेदी वाढू शकते, असा अंदाज देखील या संस्थेनं वर्तवला आहे. 

अमेरिकेनं 22 ऑक्टोबरला रशियातील मोठ्या तेल कंपन्या रोसनेफ्ट आणि ल्यूकऑईलवर निर्बंध लादले होते. यूक्रेन युद्धासाठी रशियाचं आर्थिक बळ मर्यादित करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज, एचपीसीएल, एचपीसीएल मित्तल एनर्जी, मंगळुरु रिफायनरी अँड पेट्रो केमिकल्सनं रशियाची तेल आयात थांबवली आहे. मात्र, इंडियन ऑईल सारख्या अजून निर्बंध नसलेल्या रशियन कंपन्यांकडून तेल खरेदी करत आहेत.  

सरकारी कंपन्यांकडून सर्वाधिक तेल खरेदी: रिपोर्ट

सीआरआयएनं म्हटलं की नोव्हेंबरमध्ये खासगी तेल कंपन्यांची आयात कमी झाली असली तरी सरकारी तेल कंपन्यांनी रशियन कच्चा तेलाची खरेदी 22 टक्क्यांनी वाढवली आहे. भारत जगातील तिसरा क्रूड आईलचा आयातदार देश आहे. रशिया यूक्रेन युद्ध सुरु झाल्यानं भारत रशियन क्रूड ऑईलचा मोठा खरेदीदार देश बनला आहे. रशियाकडून सवलतीच्या दरात तेल विक्री केली जातेय. भारत आता जवळपास 40 टक्के कच्चे तेल रशियाकडून खरेदी करतोय.

दरम्यान, भारताकडून कच्चा तेलाची आयात केल्यानंतर रिफाईन केल्यानंतर त्याची निर्यात देखील केली जाते.  सीआरईएच्या दाव्यानुसार नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाला निर्यात 69 टक्क्यांनी वाढली. जी गुजरातच्या जामनगर येथील रिफायनरीतून करण्यात आली.  कॅनडाला देखील आठ महिन्यानंतर रशियन तेलापासून बनवलेल्या इंधन मिळालं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget