सिझरनंतर अतिरक्तस्राव, दुसऱ्या रुग्णालयात नेलं, पण महिलेनं जीव गमावला, नांदेडमध्ये रुग्णालय चालक दवाखान्याला कुलूप लावून पसार
Nanded:महिलेचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर रुग्णालय चालक कुलूप लावून पसार झाल्याचे समोर आले . पुण्यातील तनिषा भिसे प्रकरण ताजे असताना नांदेडमध्ये घडलेल्या या घटनेने त्यामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे .

Nanded: नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय .वीस वर्षीय महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला असून डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा म्हणत गर्दी केली होती .लोहा तालुक्यातील उमरगा तांडा येथील महिलेला नांदेडमधील 'फोर्टिज स्टार ' हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते . रात्री सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाल्यानंतर महिलेला अतिरिक्त रक्तस्त्राव होऊ लागला .त्यामुळे तिला तात्काळ दुसऱ्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र आज उपचारादरम्यान सकाळी तिचा मृत्यू झालाय . महिलेचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर रुग्णालय चालक कुलूप लावून पसार झाल्याचे समोर आले . पुण्यातील तनिषा भिसे प्रकरण ताजे असताना नांदेडमध्ये घडलेल्या या घटनेने त्यामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे .
नेमकं घडलं काय?
आरती राठोड ही तरुणी काही दिवसांपूर्वी नांदेडमधील फोर्टीज स्टार हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झाली होती. काल रात्री तिची सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. मात्र, ऑपरेशननंतर आरतीला अती रक्तस्राव होऊ लागला. त्यानंतर तिला तत्काळ दुसऱ्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयाकडे माहिती घेतली असता, संबंधित हॉस्पिटलला कुलूप लावलेले आढळून आले आणि डॉक्टर व कर्मचारी पसार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गर्दी करत आरोग्य प्रशासन व संबंधित डॉक्टरांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून, मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आले आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, त्यांनी आरोग्य यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली आहे.
डोक्यावर वार करून हत्या
गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik News) शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता नाशिक खुनाच्या घटनेने हादरले आहे. पंचवटी (Panchavati) परिसरातील पेठ रोडवरील (Peth Road) फुलेनगर येथील गौडवाडी परिसरात सोमवारी (दि. 2 जून) मध्यरात्रीच्या सुमारास खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.ही घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या (Panchavati Police Station) हद्दीतील महापालिकेच्या 56 नंबर शाळेजवळील प्रवीण किराणा दुकानाजवळ घडली. मृताचे नाव संजय तुळशीराम सासे (40, रा. घर क्र. 1288, महालक्ष्मी चाळ, महाराणा प्रताप नगर, पेठ रोड, पंचवटी) असे आहे.
हेही वाचा
























