एक्स्प्लोर

50 क्विंटलच्या भाकरी, 250 क्विंटलची भाजी, नांदेडमधील बारालिंग देवस्थानाची भाजी-भाकरीची 200 वर्षांची परंपरा

Nanded News Updates: नांदेडमधील तामसा येथील बारालिंग देवस्थानाच्या वतीने भाजी-भाकरी महाप्रसादाचे आयोजन केलं जातं. याला 200 वर्षांची परंपरा आहे.

Nanded Local News Updates:  नांदेड जिल्ह्यातील तामसा येथील बारालिंग देवस्थानाच्या वतीने भाजी भाकरी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मकरसंक्रांतीनंतर करी निमित्त बारा प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्यांचा महाप्रसाद बारालिंगाला अर्पण करण्याची दोनशे वर्षाची परंपरा आहे. या महाप्रसादाच्या पूर्व तयारीसाठी जिल्हा प्रशासनही आवर्जून आपला सहभाग नोंदवले. आज ह्या महाप्रसादाच्या भाजी महाप्रसादाच्या वेळी हदगाव येथील तहसीलदार जीवराज डापकार यांनीही भाजीपाला कापून या महाप्रसाद कार्यक्रमास आपला हातभार लावलाय. बारालिंग महादेवास बारा मिसळ्याच्या भाजीचा नैवेद्य मकरसंक्रांतीनंतर करीच्या दिवशी देण्याची ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे. करी निमित्त भरल्या जाणाऱ्या या महाप्रसाद यात्रेत पंचक्रोशीतील नागरिकांसह, तेलंगणा,आंध्रप्रदेश राज्यातील हजारो भाविक हजेरी लावतात. प्रसादाच्या रुपात वांगे, बटाटा, मुळा, काकडी, टमाटे, पालक, मेथी,गोबी, गवार, शेवगा, दोडके, चुका या विविध बारा भाज्यांसह जंगली वनऔषधी टाकून ही भाजी तयार केली जाते. तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक महाप्रसादासाठी या ठिकाणी भाकरी देतात. यावर्षी जवळपास 50 क्विंटल भाकरी व 250 क्विंटल भाजीचा महाप्रसाद यावेळी करण्यात आला होता. तर काही नागरिक स्वतः घरून आणलेल्या भाकरी व बारा मिसळ्याची भाजी प्रसाद म्हणून ग्रहण करतात. 

दरम्यान बटाटा, गोबी, वांगे, मेथी, मुळा, काकडी, भेंडी, गवार, टमाटे, शेवगा, भोपळा, दोडके, कददू आदी बारा प्रकारच्या भाज्या व वनौषधी टाकून कोणताही मसाला न वापरता  तब्बल 250 क्विंटल वजनाची महाकाय महाप्रसाद यावेळी तयार केला जातो. सदर बारा मिसळ्यांचा हा महाप्रसाद ग्रहण केल्यास रोगराई होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

हदगाव तालुक्यातील तामसा येथील बारालिंग देवस्थानातील भाजी- भाकरीची यात्रा मराठवाड्यातच नाही तर विदर्भ, कर्नाटक, तेलंगणातही प्रसिद्ध आहे. या यात्रेला 179 वर्षांची परंपरा आहे. मकर संक्रातीच्या करीला (दुसऱ्या दिवशी) यात्रेच्या निमित्ताने एक लाखांहून अधिक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. येथील महत्त्व पाहून तीर्थक्षेत्राला शासनाने पर्यटनस्थळाचा क दर्जा दिला आहे. तामसा गावापासून नैऋत्येला 2 कि. मी. अंतरावर बारालिंग महादेवाचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिरात पाच फूट भुयारात काळ्या पाषाणात कोरलेले शिवलिंग आहे. बाहेर गाभाऱ्यात महादेवाची बारा पिंड पाषाणात कोरलेली आहेत. त्यासमोरच नंदी आहे. मंदिराचे खांब पाषाणाचेच असून, त्यावर कोरीव काम आहे. या मंदिराच्या पूर्वेलाच गौतम 'मंदिर आहे. गौतम ऋषींचे तेथे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. या मंदिराचे पुजारी महादलिंग महाराज कंठाळे यांच्या पूर्वजांनी भाजी-भाकरीची परंपरा सुरू केली. त्यावेळी रानातील झाडांची पाने, फळे, केळी, कंदमुळे गोळा करून भाजी बनविण्यात येत असते. त्यासाठी 15 दिवस अगोदरपासून तयारी केली जाते. यात्रेची परंपरा पाहून शासनाने देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा 'क' दर्जा दिला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBatenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रातSadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली,
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली, "कसाटा खाण्याची इच्छा होती, तर..."
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Embed widget