Vasant Chavan Death : सरपंच ते खासदार! चार दशकांंचं जाज्वल्य राजकारण, वसंत चव्हाण यांचा राजकीय इतिहास कसा होता?
Congress MP Vasant Chavan Death : नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे दुखद निधन झाले आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सरपंचपदापासून केली होती.
मुंबई : काँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण (Vasant Chavan Death) यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर हैदराबाद येथईल किम्स रुग्णालयात उपचार चालू त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वसंत चव्हाण हे काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्यांपैकी एक होते. गेल्या काही वर्षांत नांदेड जिल्ह्याला राजकीय पट बदलला. पण या काळात वसंत चव्हाण काँग्रेसशी प्रामाणिक राहिले.
2024 सालच्या निवडणुकीत दणदणीत विजय
वसंत चव्हाण हे काँग्रेसचे प्रामाणिक, एकनिष्ठ नेते म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचा लोकांशी दांडगा संपर्क होता. ते आमदार राहिलेले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नांदेड मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला होता. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळी एकदिलाने चव्हाण यांचा प्रचार केला होता. ते साधारण दोन दशके राज्य विधिमंडळात खासदार होते. त्यानंतर वयाच्या सत्तारीनंतरही राजकारणात सक्रिय राहत त्यांनी 2024 सालची लोकसभा निवडणूक लढवली आणि भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला.
भावपूर्ण श्रद्धांजली!
— Nana Patole (@NANA_PATOLE) August 26, 2024
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे. प्रतिकूल परस्थितीत देखील त्यांनी काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला.
वसंतरावजी चव्हाण… pic.twitter.com/DTGRe8p5hm
वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवला
वसंत चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अगदी सरपंचपदापासून केलेली आहे. वसंत चव्हाण यांचे वडील बळवंतराव चव्हाण हेदेखील नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ होते. आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवत वसंत चव्हाण यांनी सरपंच ते खासदार अशी वेगवेगळी पदे भूषवली. वसंत चव्हाण यांचे वडील बळवंतराव हेदेखील आमदार होते.
सरपंच ते खासदार
नांदेड जिल्ह्यात 2009 साली नायगाव मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर वसंतराव चव्हाण या मतदारसंघाचे पहिले आमदार ठरले. वसंतराव चव्हाण हे सर्वप्रथम 1978 साली आपल्या नायगाव या गावाचे सरपंच झाले. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढाच राहिला. काही काळानंतर ते जिल्हा परिषदेवर गेले. 2002 साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. त्यांचे राजकीय वजन ओळखून काँग्रेसने त्यांना लगेच विधानपरिषदेची आमदारकी दिली. त्यानंतर त्यांनी 16 वर्षे विधानपरिषद आणि विधानसभेत आमदारकी भूषवली.
नांदेडमध्ये कॉलेज, शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार, प्रसार
वसंतराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात अनेक शाळा, कॉलेजेस उभी केलेली आहेत. एज्युकेशन सोसायटीच्या या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.
हेही वाचा :
Nanded Lok Sabha : नांदेडमध्ये काँग्रेसचं विजयाचा गुलाल उधळणार- वसंतराव चव्हाण : ABP Majha