एक्स्प्लोर

Nanded MP Vasant Chavan : नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन, हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Congress Veteran Vasant Chavan Passed Away : नांदेडचे खासदार आणि काँग्रेस नेते वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळत आहे.

Nanded MP Vasant Chavan Passed Away : नांदेड : नांदेडचे खासदर वसंत चव्हाण (Vasantrao Chavan) यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मध्यरात्री त्यांची तब्येत अचनाक बिघडली. त्यावेळी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर पहाटे 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. 

काही दिवसांपूर्वी नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच, त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता. मध्येच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना सुरुवातील नांदेड येथील रुग्णालयात त्यांना दाखल केलं. काही काळ तिथे उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं वसंच चव्हामांना हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. त्यानंतर वसंत चव्हाण यांना उपचारासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सनं हैद्राबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. 

दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांची कारकीर्द

वसंत चव्हाण खासदार होण्याआधी महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय मे 2014 मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. ते जनता हायस्कूल आणि अ‍ॅग्रीचे अध्यक्षही होते. 

नांदेड जिल्ह्यात 2009 साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्यानं निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतराव चव्हाण ठरले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण-भास्करराव खतगावकर या नेत्यांविना काँग्रेस जिंकू शकते, हे त्यांनी मोठ्या आश्वासकतेनं सिद्ध करत नांदेडमधील काँग्रेसचे वर्चस्व कायम राखलं. वसंत चव्हाण 1978 साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेवरही काम केलं. 2002 साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली. तिथून पुढे तब्बल 16 वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते. नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला आहे.

2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे विजय खेचून आणला 

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अशोक चव्हांनी काँग्रेसला रामराम केला. आणि भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनं त्यांना राज्यसभेवर घेतलं आणि त्यानंतर भाजपला नांदेड आणि हिंगोली लोकसभा जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा संधी देण्यात आली तर काँग्रेसकडूनवसंतराव चव्हाणांना संधी देण्यात आली. अशोक चव्हाणांचा पाठिंब्यामुळे भाजप नांदेडची जागा सहज जिंकेल अशी चर्चा असताना मतदारांनी मात्र वेगळाच निर्णय घेतल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी भाजपच्या प्रताप चिखलीकरांचा मोठा पराभव केला आणि अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस संपली नसल्याचा संदेश दिला. 

पाहा व्हिडीओ : Vasant Chavan Death : Nanded चे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन, हैदराबादमध्ये सुरु होते उपचार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
Ananya Panday On Ambani Wedding : अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा 20 तासांनी गिरगाव चौपाटीवर दाखलLalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
Ananya Panday On Ambani Wedding : अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
Embed widget