एक्स्प्लोर

Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्याला पावसानं झोडपलं, पाच दिवसांत 47 मिमी पावसाची नोंद; ओढे, नाल्यांना पूर

Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्यात मागील पाच दिवसांत एकही दिवस पावसाचा खंड पडला नाही. पाच दिवसांत नांदेड जिल्ह्यात 47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Nanded Rain Update : मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात देखील मराठवाड्यातील (Marathwada) अनेक भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) धडाका सुरूच आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यात (Nanded District) देखील अशीच काही परिस्थिती असून, जिल्ह्यात मागच्या पाच दिवसांपासून दररोज पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. तर या पाच दिवसांच्या काळात 47.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना (Crop Loss) बसला आहे.

मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार कायम

विशेष म्हणजे मे महिन्यात उन्हाळी हंगामातील पिके काढणीला येऊन शेतकरी खरीपाच्या तयारीला लागतो. मात्र यावर्षी हवामानात मोठा बदल झाला असून, मे महिन्यात देखील दररोज पाऊस सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात मागील पाच दिवसांत एकही दिवस पावसाचा खंड पडलेला नाही. अनेक भागात शेत जमिनीत पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे पिके काढणीला देखील अडचणी येत आहेत. 

सततच्या पावसामुळे ओढे, नाल्यांना पूर

मागील पाच दिवसांमध्ये नांदेड जिल्ह्यात (Nanded Unseaonal Rain) सरासरी 47.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शेतीचे अतोनात (Crop Loss due to Rain) नुकसान झाले आहे. दरम्यान शुक्रवारी पुन्हा पहाटे हिमायतनगर तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. या पावसाने तालुक्यातील ओढे, नाल्यांना पूर आला. उन्हाळ्यातही नागरिकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. नांदेड शहर आणि परिसरातही गुरुवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

पाहा कोठे किती पाऊस...

क्र. तालुका  पाऊस 
1 किनवट   82.7 मि.मी.
2 बिलोली   81.6 मि.मी.
3 मुदखेड  77.1 मि.मी.
4 अर्धापूर  75.2 मि.मी
5 भोकर  46.6 मि.मी
6 माहूर  46.3 मि.मी
7 उमरी  45 मि.मी
8 देगलूर  42.6 मि.मी
9 नांदेड  38.9 मि.मी
10  हदगाव  36.3 मि.मी
11 हिमायतनगर  36.1 मि.मी
12 मुखेड  34.2 मि.मी. 
13 कंधार  30 मि.मी
14 लोहा  29.6 मि.मी.
15 धर्माबाद   28.7 मि.मी.

अवकाळी पावसाने शेतकरी हतबल...

खरीप हंगामात अतिवृष्टीने (Unseasonal Rain) अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामुळे पिकांचा अक्षरक्ष: चिखल झाला आहे. शेती पिकांसह जमिनीची माती देखील वाहून गेली. दरम्यान यातून स्वतःला सावरत बळीराजा पुन्हा उभा राहिला आणि  रब्बीतून काहीतरी हातात येईल म्हणून पुन्हा पेरणी केली. मात्र अवकाळी पावसाने त्या स्वप्नांवर देखील पाणी फिरवलं. मार्च, एप्रिलच नव्हे तर मे महिन्यात देखील सतत पाऊस सुरूच आहे. त्यामुळे रब्बी पिकांचं देखील आता नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना हतबल केलं आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Video : कांद्यावर जुगार खेळलो मला अटक करा, शेतकऱ्यांचा भावनिक व्हिडिओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News  : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP MajhaNanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP MajhaBKC Fire : बीकेसीमध्ये सिलेंडरचा स्फोट, दोन ते तीन दुकानांना लागली आग ABP MajhaTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Chhatrapati Sambhajinagar: सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Embed widget