धक्कादायक! बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस आल्याने नांदेडच्या शेतकऱ्याने केली आत्महत्या
Nanded: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरतपासणी पाठवला आहे.
Farmer Suicide: नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरंगल येथे धक्कादायक घटना समोर आली असून, बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस आल्याने नांदेडच्या शेतकऱ्याने केली गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याने अडचणीत असतानाच, बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस आल्याने या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. प्रदीप मुकुंद पट्टेकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
नरंगल येथील प्रदीप पट्टेकर या युवा शेतकऱ्याने पेरणीसाठी एन.डी.सी बँकेकडून 32 हजार 888 रुपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यान अतिवृष्टी, अवकाळी, दुबार पेरणी आणि परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी हातात काहीच आले नाही. अशातच बँकेकडून नोटीस आल्याने प्रदीप हे चिंतेत होते. घरातील कुटुंब प्रमुख म्हणून तेच असल्याने त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे या सर्वांना कंटाळून प्रदीप यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरतपासणी पाठवला आहे. तर पंचनामा करत घटनेची पोलिसात नोंद केली आहे.
सतत चिंतेत असायचे...
प्रदीप यांनी शेतीवर बँकेकडून कर्ज घेतले होते. सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने यावर्षी उत्पन्न चांगले होईल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीमुळे लावलेला पैसेही निघणे अवघड असल्याची परिस्थिती आहे. त्यात घरातील सर्व जबाबदारी प्रदीप यांच्यावर असल्याने ते सतत चिंतेत असायचे. दरम्यान बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस आल्याने त्यांची चिंता आणखीनच वाढली होती. मुलांचे शिक्षण, त्यात घर चावण्यासाठी लागणार पैसा कुठ्न आणणार याची चिंता त्यांना सतावत होती. त्यामुळे अखेर गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे.