Nagpur Crime : पत्नीने 40 हजारात दिली पतीला संपवण्याची सुपारी, महिलेसह चौघांना 29 पर्यंत कोठडी
दोघेही भंडाऱ्यातील एका महाविद्यालयात शिकले. सुभाष तिच्या एक वर्ग पुढे असला तरी त्याची मीनाक्षीसोबत मैत्री होती. त्यातूनच पतीसोबत सातत्याने होणाऱ्या भांडणामुळे तिने त्याला संपविण्यासाठी कट रचला.
![Nagpur Crime : पत्नीने 40 हजारात दिली पतीला संपवण्याची सुपारी, महिलेसह चौघांना 29 पर्यंत कोठडी Wife gives 40 thousand for husbands murder four including woman jailed till 29 Nagpur Crime : पत्नीने 40 हजारात दिली पतीला संपवण्याची सुपारी, महिलेसह चौघांना 29 पर्यंत कोठडी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/16/57f125d081e858da8941168b67b1ef921660642193415369_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूरः सततच्या भांडणातून पत्नीने आपल्याच पतीच्या हत्येची सुपारी (Husbands Murder) 40 हजार रुपयात दिली. ही सुपारी तीने आपल्या महाविद्यालयातील मित्राच्या (college friend) माध्यमातून दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी (Nagpur Police) त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात (District and Sessions Court) हजर केले. न्यायालयाने त्यांची 29 पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत तलमले लेआऊट (Talmale Layout) परिसरात राहणार महेश बबनराव वाढई (वय 45 ) मंगळवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास पत्नी आणि दोन मुलांसह घरी झोपले होते. तत्पूर्वी महेश यांनी मुख्य दारासह स्वयंपाकघराच्या दाराला कुलूप लावले होते. मात्र, रात्री साडेबाराच्या सुमारास अचानक दार उघडून तीन युवक घरात शिरले. त्यांनी महेश यांचे डोके चादरीखाली दाबून ठेवले. तसेच त्याच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार करीत जखमी करीत पळून गेले. त्यांनी आणि पत्नीने शेजाऱ्यांना मदतीसाठी आजाव दिला. नंतर पोलिसांना माहिती देत, महेश यांना रुग्णालयात दाखल केले. चौकशीत पोलिसांना पत्नीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तिला ताब्यात घेत चौकशी केली असता, तिनेच पतीच्या खुनाची 40 हजारात सुपारी दिली.
त्यांनी मीनाक्षी महेश वाढई (वय 27), भंडारा (Bhandara) येथील एकोली तालुक्यातील किन्ही गावातील महेश तुळशीदास गेडाम (वय 27), रोहित विजय गावतुरे (वय 18) यांना अटक केली. मात्र, या कटात सामिल असलेला सुभाष यशवंत गेडाम (वय 29, रा. किन्ही, एकोली, भंडारा) यालाही अटक केली.
असा रचला कट
सुभाष यशवंत गेडाम आणि मीनाक्षी वाढई हे दोघेही भंडाऱ्यातील पं. जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात (Jawaharlal Nehru Vidyalaya & Junior College) शिकले. सुभाष तिच्या एक वर्ग पुढे असला तरी त्याची मीनाक्षीसोबत मैत्री होती. त्यातूनच पतीसोबत सातत्याने होणाऱ्या भांडणामुळे तिने त्याला संपविण्यासाठी कट रचला. त्यासाठी सुभाष याच्याशी संपर्क साधून त्याला माहिती दिली. त्यानेच महेश आणि रोहित यांच्या मदतीने महेश वाढई याचा काटा काढण्याचे ठरविले. यासाठी सुरुवातीला त्यांनी 500 रुपये टोकन म्हणून दिले होते. काम झाल्यावर पूर्ण 39 हजार 500 रुपये देण्याचे मान्य केले होते.
इतर बातम्या
Nitin Gadkari : नागपूर शहरात साकारणार महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क, 9 हजार गरजूंना नि:शुल्क सहाय्यक साधनांचे वितरण
Nagpur Miss Nation 2022: 'मिस नेशन 2022'मध्ये नागपूरच्या सिद्धी, मुस्कानचा जलवा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)