Nagpur Miss Nation 2022: 'मिस नेशन 2022'मध्ये नागपूरच्या सिद्धी, मुस्कानचा जलवा
शहरात नुकतेच 'मिस नेशन 2022' या सौंदर्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभरातील विविध राज्यातून 14 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. यामध्ये नागपूरच्या दोघींनी 'टॉप थ्री' मध्ये स्थान मिळवला.
Nagpur : अलिकडे फॅशन क्षेत्रात करिअर घडविण्याकडे तरुणींचा कल वाढला आहे. यामध्येच विदर्भातील तरुणींना या क्षेत्रातील प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होऊन या क्षेत्रात करिअरच्या नव्या दिशा मिळाव्या या उद्देशाने 'मिस नेशन 2022'या (Miss Nation 2022) सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरातील 8 राज्यातून सुमारे 65 तरुणींनी सहभाग नोंदविला होता. सहभागींपैकी टॉप 14 मुलींची निवड अंतिम फेरीसाठी (final round) करण्यात आली. यांची अंतिम फेरी नुकतीच नागपुरात (Nagpur) झाली. गुजरातची परेवी ब्राम्हभट्ट (Parevi Brahmbhatt) 'मिस नेशन 2022' ठरली तर नागपूर शहरातील दोन्ही सौंदर्यवतींनी द्वितीय आणि तृतीय स्थान पटकावले. सिद्धी मनिष त्रिवेदी (Siddhi Trivedi) ही फर्स्ट रनरअप ठरली तर मुस्कान शर्माने (Muskan Sharma) सेकंड रनरअपचा टायटल मिळवला.
गरजूंच्या वैद्यकीय मदतीसाठी उपक्रम
रोटरी क्लब ऑफ नागपूर नॉर्थच्या (Rotary Club of Nagpur North) पुढाकाराने गरजूंच्या वैद्यकीय मदतीच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम फेरीसाठी निवडलेल्या 14 सौंदर्यवतींनी विविध श्रेणीत सोबतच्या स्पर्धकांना झुंज देत दर्जेदार प्रदर्शन केले. यास्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावरील ऑडिशनला जुलै 2022मध्ये सुरुवात झाली होती. त्यापैकी विविध राज्यातून विजेत्या ठरलेल्या अंतिम 16 स्पर्धकांना नागपुरातील कामठी मार्गावरील ईडन ग्रीन येथे चार दिवसीय ओरिएंटेशन आणि ग्रुमिंग सेशन देण्यात आले. त्यानंतर सर्व विजेत्यांची अंतिम फेरी घेण्यात आली.
रामनगर येथील भारत विद्यालयाला भेट
ओरिएंटेशनदरम्यान मनस्वी फाऊंडेशनतर्फे मुलींना 'बेटी पढाओ, बेटी बढाओ' या उपक्रमांतर्गत रामनगर येथील भारत विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींशी संवाद साधला आणि त्यांना भेट वस्तू दिल्या. सौंदर्यस्पर्धेत भाग घेत असताना मनावर मोठे दडपण असते. आपल्यात पात्रता असूनही आपण चांगले प्रदर्शन करु की नाही याची मनात भिती असते. या मनातील भितीमुळे अनेक चांगले स्पर्धक स्टेजवर आल्यावर आत्मविश्वासासह परफॉर्म करु शकत नाही. म्हणून या स्पर्धेत जिया नंदा यांनी सर्व स्पर्धतांचे योगासन सेशन घेतले. यासोबतच सर्व स्पर्धकांनी बैधनाथ येथील लाईफ सायन्स केंद्राला भेट दिली. यावेळी केंद्रातील प्रशिक्षित अंध विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धकांना 'फुट मसाज' दिली.
'मिस नेशन 2022'च्या फायनलमध्ये तीन राऊंडमधील परफॉरमन्सच्या आधारावर विजेत्यांनी निवड करण्यात आली. पहिल्या नॅशनल राऊंडमध्ये स्पर्धकांनी आपल्या राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवून आणले. दुसरे इंडो वेस्टर्न राऊंडच्या कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून सरला पांडे यांनी जबाबदारी पार पाडली. तर तिसऱ्या इव्हिनिंग गाऊन राऊंडच्या कॉस्ट्यूम डिझायनर भावना लोहिया होत्या. 'मिस नेशन 2022'चे शो डायरेक्टर म्हणून खिजर हुसैन यांनी काम पाहिले. या कार्यक्रमात दिशांत मिश्रा आणि आदित्य संतोष यांच्या दमदार लाईव्ह परफॉर्मन्सचे उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यापूर्वी मिस नेशन 2021मध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यातही मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील सौंदर्यवतींनी टायटल मिळवले होते. 'मिस नेशन 2022'च्या यशस्वीतेसाठी दिपाली मिश्रा आणि दिनेश मिश्रा यांनी परीश्रम घेतले.
स्पर्धेच्या ज्युरी म्हणून Acent बिझनेश सोल्यूशनचे संस्थापकिय संचालक आणि रोटरी क्लब नागपूरचे तत्कालिन अध्यक्ष अजय कपूर, जयपुरीया हेल्थ केअरचे वैभव जयपुरीया, एन कुमार ग्रुपच्या अर्चना कुमार, नाशिक विभागाचे आयकर आयुक्त सतीश गोयल, डॉ. विंकी रुघवानी, एबीपी नेटवर्कच्या विदर्भ संपादक सरिता कौशिक, मिस नेशन 2021 श्रेया वर्मा, तसेच मिस नेशन 2021ची उपविजेता तेजस्वीनी यांनी जबाबदारी पार पाडली.
परफॉरमन्स एन्जॉय केला अन् जिंकलीः सिद्धी
'मिस नेशन 2022'ची फर्स्ट रनरअप ठरलेल्या नागपुरच्या सिद्धी मनिष त्रिवेदी म्हणाली, या स्पर्धेत सर्वच स्पर्धकाचा परफॉर्मन्स चांगला होते. त्यामुळे आपण जिंकणार की नाही याची खात्री नव्हती. मात्र मी संपूर्ण स्पर्धेतील परफॉर्मन्स एन्जॉय केल्याचे ती म्हणाली. सिद्धी सध्या एमएससी इन जूलॉजी शिक्षण घेत आहे. यासोबतच फॅशन डिझाएनर म्हणूनही काम करत असल्याचे तिने 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले.
एक अविस्मरणीय अनुभवः मुस्कान
विविध राज्यातील स्पर्धकांसोबत एकत्र चार दिवस राहिल्यावर आमच्यात मैत्रीपूर्ण संबंध बनले होते. त्यामुळे एकमेकींना आम्ही मदत केली. या स्पर्धेत प्रत्येकाने आपले शंभर टक्के दिले. यामध्ये झालेल्या नॅशनल कॉस्ट्यूम राऊंट, टॅलेंट राऊंडमध्येही नागपूरच्याच असलेल्या इतर स्पर्धक राव्या ठाकूर, न्यूसी जैन, सुचिता शिवनकर आणि हिमाचल येथील स्पर्धक कविता यांनी चांगले प्रदर्शन केल्याची फर्स्ट रनरअप ठरलेल्या नागपुरच्या मुस्कान विपिनकुमार शर्मा हिने एबीपी माझाशी बोलताना सांगितले. मुस्कानने नुकतीच इंटेरिअर डिजाईनिंगची पदवीपूर्ण केली असून ती डिजीटल क्रिएटर म्हणून विविध ब्रॅन्डसाठी काम करत आहे.