No Water Supply : 24 तास शटडाऊन; वांजरी, कळमना जलकुंभाचा पाणीपुरवठा 'या' दिवशी राहणार बंद
Nagpur News : पाणी पुरवठा संदर्भातील अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिकेच्या मदत क्रमांक (NMC Helpline) 1800-266-9899 वर नागरिकांना संपर्क करता येईल.
Nagpur News : नागपूर महानगरपालिका (NMC) आणि OCW नेहरुनगर झोनने नवीन टाकलेले बाय-पास जलवाहिनी चार्ज करण्यासाठी तसेच वांजरा रेल्वे लाईन खाली असलेली जुनी जलवाहिनी (मोठी गळती असलेली) कायमची बंद करण्यासाठी 24 तासांसाठी शटडाऊन करण्यात येणार आहे. शुक्रवारी, 7 ऑक्टोबर सकाळी 10 ते शनिवारी, 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 पर्यंत पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या शटडाऊन दरम्यान सतरंजीपुरानगर झोन अंतर्गत येणारे 2 जलकुंभ (Water Tanks) (वांजरी आणि कळमना जलकुंभ) मधील पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.
आपल्या माहितीकरिता नागपूर महानगरपालिका आणि OCW नेहरुनगर झोनने हा शटडाऊन आधी 28 सप्टेंबरला जाहीर केला होता, परंतु 27 सप्टेंबरला अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व यंत्रणा कोलमडली आणि आंतरजोडणी करण्याच्या दोन्ही ठिकाणी (शटडाऊन तांत्रिक कामाच्या जागेवर) च्या जागेवर खूप पाणी साचल्यामुळे तेथे काम धोकादायक झाले होते. त्यामुळे 27 तारखेचा शटडाऊन आता पुढे ढकलून येत्या शुक्रवारी सकाळी दहा ते शनिवार सकाळी दहापर्यंत घेण्याचे ठरवले आहे.
या भागातील पाणी पुरवठा खंडीत
सतरंजीपुरा झोन (NMC Satranjipura Zone) मधील या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा बाधित राहणारे भागांमध्ये वांजरी जलकुंभ : राजीव गांधी नगर, संतोष नगर, कुंदनलाल गुप्ता नगर, विनोबा भावे नगर, नागसेनवन, वनदेवी नगर, बेले नगर, कामना नगर, वैभव लक्ष्मी नगर, मेमन कॉलोनी, वैष्णोदेवी नगर गुलशन नगर, पांडुरंग नगर, बबळेश्वरी नगर, देवी नगर, त्रिमूर्ती नगर आणि वांजरी जुनी वस्ती. कळमना NIT जलकुंभ : कळमना वस्ती, गणेश नगर, समाज एकता नगर, वाजपेयी नगर, नागराज नगर, म्हाडा कॉलोनी आणि नजीकचा भाग राहील.
'या' क्रमांकावर करा संपर्क
शटडाऊन कालावधी दरम्यान आणि नंतर देखील बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करुन ठेवावे, अशी सूचना नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर (OCW) यांच्यावतीने करण्यात आली आहे. अधिक माहितीकरता नागपूर महानगरपालिकेच्या मदत क्रमांक (NMC Helpline) 1800-266-9899 वर नागरिकांना संपर्क करता येईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Court News : जन्मापूर्वी प्रकल्पग्रस्त घोषित, उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाकडून मागवले उत्तर