Vidarbha MLA List : नागपूरसह विदर्भात कोणाचं वर्चस्व? कोणत्या पक्षाचे किती आमदार? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Vidarbha MLA List : नागपूरसह विदर्भातील 12 मतदारसंघात कोणाचं वर्चस्व आहे? तसेच कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया एका क्लिकवर.
Vidarbha MLA List June 2024 मुंबई:संपूर्ण राज्याला आतुरता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) चे बिगुल आज वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. भारत निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र आणि झारखंड (Maharashtra Vidhansabha Election 2024) या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोज आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित करणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्यामुळे आजच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे नवी विधानसभा त्यापूर्वीच अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात आचारसंहिता लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभेत 288 आमदार (Maharashtra 288 MLA list) निवडले जातात. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी भाजप (BJP) आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यावेळी एकसंघ शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.
राज्यात सध्या भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची सत्ता आहे. मात्र, नागपूरसह विदर्भात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. परिणामी आगामी निवडणुकीत कोणात्या पक्षाची सत्ता येणार आता हा येणारा काळच ठरवणार आहे. दरम्यान, विदर्भात सध्या नेमकं कोणाचं वर्चस्व आहे? कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
नागपूर जिल्ह्यातील आमदार : 12 (Nagpur MLA List)
1) काटोल विधानसभा - अनिल देशमुख (राष्ट्रवादी- शरद पवार)
2) सावनेर विधानसभा - सुनील केदार (काँग्रेस)
3) हिंगणा विधानसभा - समीर मेघे (भाजप)
4) उमरेड विधानसभा - राजू पारवे (काँग्रेस) - सध्या शिवसेना एकनाथ शिंदे
5) नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा- देवेंद्र फडणवीस (भाजप)
6) नागपूर दक्षिण विधानसभा - मोहन मते (भाजप)
7) नागपूर पूर्व विधानसभा - कृष्णा खोपडे (भाजप)
8) नागपूर मध्य विधानसभा - विकास कुंभारे (भाजप)
9) नागपूर पश्चिम विधानसभा - विकास ठाकरे (काँग्रेस)
10) नागपूर उत्तर विधानसभा - नितीन राऊत (काँग्रेस)
11) कामठी विधानसभा - टेकचंद सावरकर (भाजप)
12) रामटेक विधानसभा - आशिष जयस्वाल (अपक्ष)
बुलढाणा जिल्ह्यातील आमदार : 07 (Buldhana MLA List)
1) मलकापूर विधानसभा - राजेश एकाडे (काँग्रेस)
2) बुलढाणा विधानसभा - संजय गायकवाड (शिवसेना - शिंदे)
3) चिखली विधानसभा - श्वेता महाले (भाजप)
4) सिंदखेड राजा विधानसभा - राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
5) मेहकर विधानसभा - संजय रायमूलकर (शिवसेना शिंदे)
6) खामगाव विधानसभा - आकाश फुंडकर (भाजप)
7) जळगाव जामोद विधानसभा - संजय कुटे (भाजप)
अकोला जिल्ह्यातील आमदार : 05 (Akola MLA List)
1) अकोट विधानसभा - प्रकाश भारसाकळे (भाजप)
2) बाळापूर विधानसभा - नितीन देशमुख (शिवसेना - उद्धव ठाकरे)
3) अकोला पश्चिम विधानसभा - गोवर्धन शर्मा (भाजप) (निधन)
4) अकोला पूर्व विधानसभा - रणधीर सावरकर (भाजप)
5) मूर्तिजापूर विधानसभा - हरीश पिंपळे (भाजप)
वाशिम जिल्ह्यातील आमदार : 03 (Washim MLA List)
1) रिसोड विधानसभा - अमित झनक (काँग्रेस)
2) वाशिम विधानसभा - लखन मलिक (भाजप)
3) कारंजा विधानसभा - राजेंद्र पाटनी (भाजप)
अमरावती जिल्ह्यातील आमदार : 08 (Amravati MLA List)
1) धामणगाव रेल्वे विधानसभा - प्रताप अरुण अडसड (भाजप)
2) बडनेरा विधानसभा - रवी राणा (अपक्ष)
3) अमरावती विधानसभा - सुलभा खोडके (काँग्रेस)
4) तिवसा विधानसभा - यशोमती ठाकूर (काँग्रेस)
5) दर्यापूर विधानसभा- बळवंत वानखेडे (काँग्रेस) (लोकसभेवर निवड)
6) मेळघाट विधानसभा - राजकुमार पटेल (प्रहार जनशक्ती)
7) अचलपूर विधानसभा - बच्चू कडू (प्रहार जनशक्ती)
8) मोर्शी विधानसभा - देवेंद्र भुयार (स्वाभिमानी) - सध्या अजित पवारांसोबत
वर्धा जिल्ह्यातील आमदार : 04 (Wardha MLA List)
1) आर्वी विधानसभा - दादाराव केचे (भाजप)
2) देवळी विधानसभा - रणजित कांबळे (काँग्रेस)
3) हिंगणघाट विधानसभा - समीर कुणावार (भाजप)
4) वर्धा विधानसभा - पंकज भोयर (भाजप)
भंडारा जिल्ह्यातील आमदार : 03 (Bhandara MLA List)
1) तुमसर विधानसभा - राजेंद्र कारेमोरे (राष्ट्रवादी - अजित पवार )
2) भंडारा विधानसभा - नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) सध्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा
3) साकोली विधानसभा - नाना पटोले (काँग्रेस)
गोंदिया जिल्ह्यातील आमदार : 04 (Gondia MLA List)
1) अर्जुनी मोरगाव विधानसभा - मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी - अजित पवार)
2) तिरोरा विधानसभा - विजय रहांगदळे (भाजप)
3) गोंदिया विधानसभा - विनोद अग्रवाल (अपक्ष)
4) आमगाव विधानसभा - मारुती कारोटे (काँग्रेस)
गडचिरोली जिल्ह्यातील आमदार : 03 (Gadchiroli MLA List)
1) आरमोरी विधानसभा - कृष्णा गजबे (भाजप)
2) गडचिरोली विधानसभा - डॉ. देवराव होळी (भाजप)
3) अहेरी विधानसभा - धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी- अजित पवार)
चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार : 06 (Chandrapur MLA List)
1) राजुरा विधानसभा - सुभाष धोटे (काँग्रेस)
2) चंद्रपूर विधानसभा - किशोर जोर्गेवार (अपक्ष)
3) बल्लारपूर विधानसभा - सुधीर मुनगंटीवार (भाजप)
4) ब्रह्मपुरी विधानसभा - विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
5) चिमुर विधानसभा - कीर्तीकुमार भांगडिया (भाजप)
6) वरोरा विधानसभा - प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) (सध्या लोकसभेवर)
यवतमाळ जिल्ह्यातील आमदार : 07 (Yavatmal MLA List)
1) वणी विधानसभा - संजीव रेड्डी बोदकुलवार (भाजप)
2) राळेगांव विधानसभा - अशोक उईके (भाजप)
3) यवतमाळ विधानसभा - मदन येरावार (भाजप)
4) दिग्रस विधानसभा - संजय राठोड (शिवसेना- एकनाथ शिंदे)
5) आर्णी विधानसभा - संदीप धुर्वे (भाजप)
6) पुसद विधानसभा - इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी - अजित पवार)
7) उमरखेड विधानसभा - नामदेव ससाणे (भाजप)
महत्वाच्या बातम्या: