आयकर छापेमारी, कुटेंचा भाजप प्रवेश; बावनकुळे म्हणतात आमचा पक्ष 'ओपन'
Tirumala Suresh Kute : विशेष म्हणजे, आयकर विभागाच्या कारवाईमुळेचं कुटे कुटुंब भाजपमध्ये गेल्याचा आरोप होत आहे. मात्र, हे आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी फेटाळून लावले आहे.
नागपूर : काही दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या कारवाईमुळे चर्चेत आलेले आणि बीडमधील तिरुमला (Tirumala) उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे (Suresh Kute) आणि अर्चना कुटे (Archana Kute) यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. विशेष म्हणजे, आयकर विभागाच्या कारवाईमुळेचं कुटे कुटुंब भाजपमध्ये गेल्याचा आरोप होत आहे. मात्र, हे आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी फेटाळून लावले आहे. तर, आमचा भाजप पक्ष ओपन असल्याचे बावनकुळे म्हणाले.
याबाबत बोलतांना बावनकुळे म्हणाले की, ईडी, "आयकर विभागाच्या नोटीसा खूप लोकांना जातात. त्यामुळे त्याचे उत्तर त्यांना द्यावे लागतात. त्यामुळे गुन्हा सिद्ध होण्यापूर्वी कोणीच दोषी नसतो. कारवाई होत असते, गंभीर गुन्हा असल्यास गंभीर कारवाई होत असते. आता कुटे यांच्याकडे आयकर किंवा ईडीवाले गेले असतील. त्यामुळे जेव्हा दोषी ठरतील तेव्हा बघू, असे बावनकुळे म्हणाले. आमचा पक्ष म्हणजे सर्वांना मत देण्याचा अधिकार आहे. मत देणाऱ्या व्यक्तीला जर वाटत असेल की, भाजप पक्षात काम करायले पाहिजे. तर, भारतीय जनता पार्टी ओपन आहे. त्यामुळे कुटे यांच्यावर जे काही आरोप असतील किंवा त्यांना नोटीस गेली असतील तर त्यावर ते उत्तर देतील. त्यांच्या भाजप पक्षात येण्याचा आणि त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा कोणताही संबध नाही. असा कोणताही संबध जोडू देखील नाही. अनेक लोकांना अशा आयकर विभागाच्या नोटीसा येत असतात. पण ज्यांनी गंभीर गुन्हे केले, ते जेलमध्ये जातात," असे बावनकुळे म्हणाले.
आरक्षणाच्या मुद्यावर प्रतिक्रीया...
दरम्यान, यावेळी आरक्षणाच्या मुद्यावर बोलतांना बावनकुळे म्हणाले की, "आम्हीं सरकारला ठराव पाठवला आहे की, मराठा समजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणास एक टक्का सुद्धा धक्का लागू नयेत. मराठा समाजाला जास्तीचं व टिकणारे आरक्षण कसे मिळेल यासाठी सरकार काम करत आहे. ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास शरद पवारांनी देखील मान्य केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकारकडे पर्याय उपलब्ध आहे. तसेच, भारतीय जनता पार्टी मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचे" बावनकुळे म्हणाले.
अशी साजरी करणार दिवाळी...
उद्यापासून पाचं दिवस भाजप कार्यकर्ते पारावरची दिवाळी साजरी करणार आहे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीजवळ जावून आमचे कार्यकर्ते दिवाळी साजरी करणार आहे. लोकांच्या घरावरील दिवे पाहून दिवाळी साजरी करण्याची अपेक्षा बाळगणाऱ्या आणि ज्यांच्याघरी दिवाळी साजरी होत नाही अशा लोकांसोबत आम्ही दिवाळी साजरी करतोय, असेही बावनकुळे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: