एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : फडणवीसांना 2019 मध्ये मुख्यमंत्री होऊ दिलं असतं, तर त्यांनी सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवलं असतं : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule on Maratha Reservation : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध केला नसता, तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात सर्व प्रयत्न करून मराठा आरक्षण टिकवले असते, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

नागपूर :  "शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) 2019 मध्ये  विद्यमान उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध केला नसता, तर त्यावेळी देण्यात आलेले मराठा आरक्षण (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) टिकावे यासाठी फडणवीसांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले असते. त्यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून  दिला असता", असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला. ते नागपुरात बोलत होते.

राज्याचे अन्न आणि नगरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी  मराठा  आरक्षणाबाबत ( Maratha reservation) घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर, सत्ताधारी नेत्यांमध्येच वादावादी सुरु झाली आहे.  मराठा आरक्षणाविषयी मतमतांतर दिसून येत  आहे. अशातच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर थेट आरोप केला. मराठा आरक्षणाचा घात करणारे खरे आरोपी उद्धव ठाकरे असल्याचा हल्लाबोल, बावनकुळे यांनी केला. 

देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण टिकवलं असतं (Chandrashekhar Bawankule on Devendra Fadnavis)

उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध केला नसता, तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात सर्व प्रयत्न करून मराठा आरक्षण टिकवले असते. मराठा समाजाला न्याय  देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र  उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे आज हा विषय अद्याप प्रलंबित आहे. असे असले तरी महायुतीचं सरकारच मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे, असं बावनकुळे म्हणाले. 

सर्वपक्षीय बैठकीत ठरलेली भूमिका, तीच छगन भुजबळांची भूमिका (Chandrashekhar Bawankule on Chhagan Bhujbal)

छगन भुजबळांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या  राजकारणात नवा वादंग उठला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मराठा आरक्षणाविषयीच्या त्यांच्या भूमिकेमुळे  पुन्हा संभ्रम निर्माण होत आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, "छगन भुजबळ यांची भूमिका सर्वपक्षीय बैठकीच्या भूमिकेसारखीच आहे, ते वेगळे काहीच बोलले नाहीत.देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ज्याप्रमाणे तत्कालिन काळत वेगळे आरक्षण दिले होते, तसेच टिकावू आरक्षण आतादेखील महायुतीचे सरकार देईल" असा मला विश्वास आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही (Chandrashekhar Bawankule on OBC)

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसू नये हीच एक मागणी छगन भुजबळ यांची आहे. आम्ही कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही असे टिकावू आरक्षण मराठा समाजाला देऊ, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांचं जातीने लक्ष (Chandrashekhar Bawankule on CM Eknath Shinde)

सर्वपक्षीय बैठकीत ठरल्याप्रमाणे सरकारने काम करावं असेच सध्या भुजबळ बोलत आहेत.त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने सांगितले होते की मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं जाईल. आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या विषयात जातीने लक्ष घातले असून, हा तिढा लवकरच सुटेल, असं बावनकुळेंनी नमूद केलं.  

Chandrashekhar Bawankule on Maratha Reservation Video : चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

संबंधित बातम्या 

"उद्धव ठाकरेंनी माफी मागितली पाहिजे त्यांच्यामुळे महाराष्ट्र जळतोय" 

BJP : महाविकास आघाडीचा एकही खासदार निवडून येणार नाही अशी भीती: चंद्रशेखर बावनकुळे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget