एक्स्प्लोर

NMC News : लोकसहभागातून 'स्वच्छ मोहल्ला स्पर्धा' ; विजेत्या भागात 25, 10, आणि 5 लाखांची अतिरिक्त विकासकामे

Nagpur News : विजेत्यांना बक्षीसांमध्ये जाहिर रक्कमेचे मोहल्ल्यामध्ये विकासकामे करण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांसाठी 3 मोहल्ल्यांची निवड केली जाईल. त्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये असे 75 लाख रुपये बक्षीस मिळेल.

Nagpur News : शहराला स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. लोकसहभागातून शहर स्वच्छतेसाठी मनपाद्वारे (NMC) महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिका (nagpur municipal corporation) आणि नागपूर@2025 यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयोजित स्वच्छ मोहल्ला स्पर्धेत एखाद्या नगराचे किंवा भागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नागरिकांचा कोणताही समूह सहभागी होऊ शकतो, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पत्रकार दिली.

स्वच्छ मोहल्ला स्पर्धेसंदर्भात माहिती देण्यासाठी मनपा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, नागपूर@2025 चे प्रमुख शिवकुमार राव, संयोजक निमिष सुतारिया, मल्हार देशपांडे, किरण मुंधडा, योगेश अनेजा, अजिंक्य टोपरे, अग्रवाल. आदी उपस्थित होते.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...

  • मोहल्ला या भागात 200 पेक्षा कमी आणि 500 पेक्षा जास्त घरे नसावीत. 
  • मोहल्ल्यातील प्रतिनिधी 8380002025 या व्हॉट्सॲप क्रमांकावरुन किंवा ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून स्पर्धेसाठी अर्ज दाखल करु शकतात किंवा ऑफलाईन माध्यमातून, नागपूर महानगरपालिकेच्या झोन कार्यालयात छापील अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. झोन कार्यालयातून आवश्यकतेनुसार अधिक माहिती आणि मदत मिळू शकेल.
  • मोहल्ल्यातील एका परिसरातील किमान दहा कुटुंबांची संबंधित अर्जावर स्वाक्षरी असणे किंवा स्पर्धेतील सहभागाला त्यांचा पाठिंबा असणे, आवश्यक आहे. 

स्पर्धेचा कालावधी, गुणांकन आणि पुरस्कार

1. ही स्पर्धा 31 मार्च 2023 पर्यंत सुरु राहणार आहे.
2. स्पर्धेसाठी अर्ज प्राप्त होताच, मोहल्ल्याचे मूल्यांकन करण्यात येईल. या माध्यमातून मोहल्ल्याचे निर्धारित मापदंडांनुसार मूल्यांकन होईल.
3. नागपूर शहरातील नामांकित वर्तमानपत्रांच्या संपादकांच्या मार्गदर्शनात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या चमूमार्फत मूल्यांकन करण्यात येईल.
4. स्पर्धेचा अंतिम निर्णय एप्रिल 2023 मध्ये जाहीर करण्यात येईल.

मूल्यांकन करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे आणि मापदंड

1. कचऱ्याचे वर्गीकरण, डोअर टू डोअर आणि फाटकापर्यंत हिरवा कचरा जमा करणे (ओला किंवा जैवविघटनशील कचरा)
2. कचरा दररोज मनपाच्या कर्मचाऱ्यांकडून उचलला जायला हवा.
3. मोहल्ल्यातील प्रत्येक दुकान आणि विक्रेत्याने एकदा वापरुन फेकावयाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातलेली असावी.
4. नागरिकांकडून स्वच्छता अॅपचा वापर
5. ओल्या कचऱ्यातून कंपोस्टची निर्मिती
6. सर्व नागरिकांना, दुकानांमध्ये जागरुकता अभियान, स्वच्छतेविषयक संदेश देण्यात यावा.
7. विविध कंपन्या किंवा मनपाच्या उपक्रमांमधील बांधकामाचा कचरा परिसरात टाकण्यास बंदी आणि यासाठी परिसराची नियमित साफसफाई केली जाणे आणि त्यावर देखरेख असणे.
8. स्वच्छ उद्याने, सार्वजनिक जागा, वाहनतळ (पार्किंग) आदींची स्वच्छता
9. कचरा व्यवस्थापन/किंवा स्वच्छतेविषयक अभिनव योजना/संकल्पनांची आखणी
10. प्राणी आणि कुत्र्यांच्या घाणीचे व्यवस्थापन
11. मनपाच्या चमूकडून सार्वजनिक शौचालयांचे व्यवस्थापन सांडपाण्यावर प्रक्रिया, सहज उपलब्धता आणि स्वच्छता
12. ब्लॅक स्पॉट अर्थात कचराकुंड्यांचा निचरा आणि पुन्हा साचू नये, यासाठी देखरेख
13. मोहल्ला किंवा परिसरात रस्त्यावरील विक्रेते, फिरती दुकाने आणि आस्थापनांमध्ये कचराकुंड्या
14. लाल डाग अर्थात थुंकलेली जागा स्वच्छ करणे आणि त्यात वाढ होऊ नये, यासाठीची काळजी
15. तीन आर म्हणजे पुनर्वापर (रियुझ), वापर कमी करणे (रिड्यूस), पुनः प्रक्रिया (रिसायकल) या त्रिसूत्रीची अंमलबजावणी आणि कोरड्या कचऱ्याचे वर्गीकरण
16. मनपाच्या यंत्रणेच्या माध्यमातून सांडपाण्याचा निचरा
17. नागरिक आणि स्वच्छता कर्मचाऱ्याना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कृत किंवा सन्मानित केले जाणे

25 लाखांचे प्रथम पुरस्कार

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. बक्षीसांमध्ये जाहीर रक्कमेचे मोहल्ल्यामध्ये विकासकामे करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी तीन मोहल्ल्यांची निवड केली जाईल. तिनही मोहल्ल्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये असे एकूण 75 लाख रुपये बक्षीस मिळेल. दुसऱ्या क्रमांसाठी 5 मोहल्ल्यांची निवड केली जाईल व त्यांना प्रत्येकी 10 लाख असे एकूण 50 लाख रुपये बक्षीस मिळेल. तृतीय पुरस्कार 7 मोहल्ल्यांना प्रदान केले जाईल यामध्ये प्रत्येकी 5 लाख असे एकूण 35 लाख रुपये पुरस्कार असेल. मोहल्ला किंवा आरडब्ल्यूएत सहभागी प्रत्येकाला विकासनिधीच्या स्वरूपात पुरस्काराची रक्कम प्रदान करण्यात येईल.

नागपूर महानगरपालिका आणि नागपूर@2025 यांच्याकडून सहकार्य

या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांनी लहान शहर किंवा निवासी एककाप्रमाणे काम करणे अपेक्षित आहे. यामागची संकल्पना अशी आहे की, मोहल्ला किंवा आरडब्ल्यूए यांनी संबंधित परिसराची मालकी घ्यावी आणि त्या भागाचे सुशासन, मनपाच्या विविध आयुधांचा वापर करावा. त्यासोबतच आपला परिसर स्वच्छ, निर्जंतुक आणि मापदंडांनुसार व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर@2025 यांची संयुक्त चमू सहभागी स्पर्धकांना आवश्यक ते सहकार्य तातडीने प्रदान करेल. यासाठी समर्पित मदतक्रमांक आणि सहायक केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. रस्त्यावरील कचऱ्याचे वर्गीकरण, कचरा उचलून नेणे, कचरा उचलून नेण्यासाठी कंत्राटदार, समाजविघातक व्यक्तींची ओळख पटवणे, शौचालयाचे संचालक याशिवाय इतर सर्व पाठिंबा देणाऱ्या सेवा यंत्रणा मोहल्ला/आरडब्ल्यूए यांना आपले अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समर्पित वृत्तीने सहकार्य आणि पाठिंबा देतील. या माध्यमातून अपेक्षित उद्दिष्ट्ये साध्य करता येतील.

ही बातमी देखील वाचा...

ट्विन टॉवर पाडण्यासाठी नागपुरातून स्फोटके ; 3 हजार 700 किलोपेक्षा जास्त स्फोटकांचा उपयोग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget