एक्स्प्लोर

Sunil Kedar : सुनील केदार यांच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना घेरण्याची भाजपची रणनीती, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांचा वाद शिगेला

Sunil Kedar News : नागपुरातील जिल्हा परिषद आणि बहुतांश पंचायत समित्यांवर काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचे वर्चस्व आहे. त्यामुळेच त्यांना भाजपने अडकवल्याची चर्चा जोरात सुरू आहे. 

नागपूर : दीडशे कोटीच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेसचे  जेष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar)  कारागृहात आहेत. त्यानंतर आता भाजपने सुनील केदार यांच्या समर्थकांना  घेरायल सुरवात केल्याचं दिसतंय. भाजपने  याची सुरवात नागपूर जिल्हा परिषदपासून केल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदमधील सुनील केदार यांच्या फोटोचा विषय असो की पदाधिकाऱ्यांचा कमिशनचा विषय, सध्या भाजपने केदार यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. त्यावर केदार समर्थक देखील भाजप विरुद्ध मैदानात उतरले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर केदार यांचे वर्चस्व

नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे या भाजपच्या मातब्बर नेत्यांचा गड असताना देखील नागपूर जिल्ह्यावर सुनील केदार यांचे एकछत्री वर्चस्व आहे. नागपूर जिल्हा परिषद असो की जिल्ह्यातील 13  ही पंचायत समित्या, यावर सुनील केदार यांच्या गटाची सत्ता आहे. जिल्ह्यातील बहुतांश नगरपरिषद आणि नगर पंचायत सुनील केदार गटाच्या ताब्यात आहे. 

रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदारसंघ सुनील केदार बऱ्यापैकी नियंत्रित करतात. हेच भाजप नेत्यांना पचनी पडते नव्हते. त्यामुळे वीस वर्ष जुन्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याच्या प्रकरणात भाजपने हात घालत सुनील केदार यांच्या विरुद्ध न्यायालयीन लढा लढणाऱ्यांना कायदेशीर मदत केली आणि  सुनील केदार यांना कारागृहाची हवा दाखली. 

नागपूर जिल्हा परिषदेच्या भ्रष्टाचारावर बोट

मात्र या घटनेने सुनील केदार यांचे कार्यकर्ते आणखी चवताळून उठले. त्यामुळे सुनील केदार यांच्यानंतर आता त्यांचे कार्यकर्ते आणि भाजप हा नवीन संघर्ष नागपूर जिल्ह्यात सुरु झाल्याचं दिसतंय. त्याची सुरवात भाजपने काँग्रेसची सत्ता असलेल्या नागपूर जिल्हा परिषदपासून झाली. नागपूर जिल्हा परिषदच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवत भाजप समर्थकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या भष्ट्राचाराची चौकशी करावी अशी मागणी केली आणि सुनील केदार यांच्या समर्थकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा परिषदेतील फोटो काढण्याची मागणी

भाजप इतक्यावरच थांबली नाही तर नागपूर जिल्हा परिषदमधील लावलेले सुनील केदार यांचे  फोटो काढण्यात यावे अशी मागणी भाजपच्या जिल्हा परिषदमधील विरोधी पक्ष नेते आतिष उमरे यांनी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. तर त्याला लगेच सुनील केदार समर्थक जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकूडे यांनी विरोध केला. 

केदार समर्थकांनी कुणबी समाजाच्या बैठकीत सुनील केदार यांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला. सुनील केदारांसाठी कुणबी कार्डच्या माध्यमातून दबाव निर्माण करायला केदार समर्थकांनी सुरवात केली. त्यामुळे भाजपची अडचण झाली.

सुनील केदार कारागृहात गेल्याने त्यांचे समर्थक भाजपवर चिडून आहे. तर केदार कारागृहात गेल्यानंतरही केदार समर्थकांची आक्रमता कमी झाली नसल्याने भाजप आणखी आक्रमक झाली आहे. त्यामुळे  सध्या नागपूर जिल्ह्यात भाजप विरुद्ध सुनील केदार समर्थक यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे.  

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget