Nagpur Crime: नागपूरमध्ये एक्स गर्लफ्रेंडवरुन राडा, 12 जणांच्या जमावाकडून वाहनांची तोडफोड, हातात धारदार शस्त्रं, दोनजण गंभीर जखमी
Nagpur Crime News : नागपूरच्या महाल परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात काही तरुणांच्या टोळक्याने अनेक दुचाकी फोडल्याची घटना घडली आहे.

Nagpur Crime News : नागपूरच्या महाल परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात काही तरुणांच्या टोळक्याने अनेक दुचाकी फोडल्याची (Crime News) घटना घडली आहे. जवळ जवळ अर्धा डझनपेक्षा जास्त गाड्यांची यावेळी तोडफोड करण्यात आली आहे. हातात धारदार शस्त्र घेऊन रात्री 11 च्या सुमारास परिसरात धुमाकूळ (Nagpur Crime News) घालण्यात आला आहे.
Nagpur Crime News : एक्स गर्लफ्रेंडची दुसऱ्या मुलाशी मैत्री, इन्स्टा मित्राच्या परिसरातील गाड्यांची तोडफोड
मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या एक्स गर्लफ्रेंडची दुसऱ्या मुलाशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली, त्यावरून काही तरुणाचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच रागातून तरुणांच्या एका टोळक्याने काल रात्री गाडीखाना परिसरात राहणाऱ्या मैत्रिणीचा इन्स्टा मित्राच्या परिसरातील (गाडीखाना, जोहरीपुरा) परिसराततल्या गाड्यांची तोडफोड केली. यावेळी शस्त्रास्त्र घेऊन परिसरात दहशत पसरवण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान यातील तोडफोड करणाऱ्या टोळक्यातील काही जणांना स्थानिकांनी पकडून पोलिसात स्वाधीन केले आहे.
Nagpur Crime : तोडफोड करणाऱ्या टोळक्यात 12 जण असल्याचं तपासात समोर
दरम्यान, प्राथमिक तपासानंतर तोडफोड करणाऱ्या टोळक्यात 12 जण असल्याचं तपासात समोर आलेय. तर आरोपींमध्ये अनेक जण अल्पवयीन आहेत. सध्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गणेशपेठ पोलीस पुढील तपास करत आहे. 3 मुलांना या प्रकरणी ताब्यात घेतलं असून मुलीच्या मैत्रीवरून हा वाद झाल्याची माहिती आहे. इंस्टग्रामच्या मैत्रीवरून हा वाद झालाय. मात्र यात कुठलाही धार्मिक वाद नसून मुला-मुलींच्या मैत्रीच्या संदर्भातला वाद आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. मात्र नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता पोलीस तपासाला सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी केलं आहे.
Nagpur Violence : वर्षभरापूर्वी याच भागात उसळली होती मोठी दंगल
नागपुरातील हा तोच भाग आहे, ज्या परिसरात 17 फेब्रुवारी 2025 ला औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला होता. नागपूरात औरंगजेबच्या कबर प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर सोमवारी सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली होती. त्यात अनेक निष्पाप लोकांचे मोठे नुकसान झाले होते. तर अनेक दिवस परिसरात संचार बंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांचे मोठे आर्थिक नुकसानही झाले होते. त्यामुळे पोलीस प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास करत आहे. मात्र नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























