Wainganga Nalganga River Connect Project : विदर्भासाठी फडणवीस सरकारची मोठी भेट, महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता, 'या' जिल्ह्यांना होणार मोठा फायदा
Wainganga Nalganga River Connect Project : विदर्भात सिंचन क्षेत्रात मोठी क्रांती घडविणारा आणि विदर्भासाठी महत्वकांक्षी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.

Wainganga-Nalganga River Linking Project : विदर्भात सिंचन क्षेत्रात मोठी क्रांती घडविणारा आणि विदर्भासाठी महत्वकांक्षी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प (Vainganga Nalganga River Connect Project) संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. विदर्भातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. फडणवीस सरकारने या संदर्भात घोषणा करत वैदर्भीयांना मोठी भेट दिली आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील घरगुती व औद्योगिक पाणी वापराचा मोठा प्रश्न सुटणार आहे.
विदर्भातील एकूण 8 जिल्ह्यांना फायदा होणार, 38 तालुक्यातून कालवा जाणार (Wainganga Nalganga River Connect)
दरम्यान, या प्रकल्पामुळे 388.28 कि.मी. लांबीचा कालवा तयार होणार आहे. यात विदर्भातील एकूण 8 जिल्ह्यातील 38 तालुक्यातून कालवा जाणार आहे. या प्रकल्पाचा नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिमसह भंडारा या जिल्ह्यांना फायदा होणार आहे. या प्रकल्पात एकूण 20.49 कि. मी.च्या 13 बोगद्यांचा समावेश आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विभागानं हा मोठा निर्णय घेतला आहे.
विदर्भासाठी कसा गेम चेंजर प्रोजेक्ट ठरणार? (Wainganga Nalganga River Connect)
तब्बल 4 लाख 4 हजार 281 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार
- प्रकल्पातून 1,804.78 दलघमी म्हणजेच 64 टीएमसी कृषि व औद्योगिक पाणी वापराचा प्रश्न सुटणार
- प्रकल्पासाठी एकूण 31 हजार 494 हेक्टर एवढे भूसंपादन होणार
- पुढील 10 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन
- प्रकल्पग्रस्त 39 गावांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार
- प्रकल्पास आवश्यक पर्यावरण, वन, केंद्रीय जल आयोग आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरण यांच्या मान्यता घेण्यात येणार
- प्रकल्पाअंतर्गत उपसा सिंचन योजना या सौर उर्जेवर चालवण्यात येणार, त्यासाठी अतिरिक्त जमीन घेण्यात येणार
- प्रकल्पाचे लाभ व्यय गुणोत्तर (BCR) 1.58 व अंतर्गत परतावा दर (IRR) 14.61 इतका आहे
इतर महत्वाच्या बातम्या

























