एक्स्प्लोर

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबणार? परिवहन विभागाकडून खास मोहीम 

Maharashtra Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग वाहतुकीस खुला झाल्यापासून गेल्या 40 दिवसात या महामार्गावर जवळपास 65 अपघात झाले आहेत. त्यामुळे हा महामार्ग समृद्धी ऐवजी अपघातांची मालिका घेऊन आला की काय असं चित्र निर्माण झालंय.

Maharashtra Samruddhi Mahamarg : नागपूर आणि मुंबई दरम्यान अंतर कमी करण्यासाठी जलद गती असा समृद्धी महामार्ग बनवण्यात आला आहे. मात्र हा महामार्ग सुरू झाल्यापासून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या कारणाने झालेले अपघात आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सक्रिय झाला आहे. या महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी खास मोहीम राबवण्यात येत आहे.   
 
नागपूर आणि मुंबई दरम्यानचा समृद्धी महामार्ग हा सरळ महामार्ग आहे. पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी हा महामार्ग सुरू करण्यात आला आहे. महामार्ग वाहतुकीस खुला झाल्यापासून गेल्या 40 दिवसात या महामार्गावर जवळपास 65 अपघात झाले. एकट्या बुलढाणा जिल्ह्यात 23 अपघात झाले आहेत. त्यामुळे हा महामार्ग समृद्धी ऐवजी अपघातांची मालिका घेऊन आला की काय असं चित्र उभं राहिलं आणि त्यामुळे प्रशासनही हादरले आहे. आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि परिवहन विभाग हे अपघात टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. हे अपघात कशामुळे होतात त्याची कारणे काय यावरही आता चर्चा सुरू झाली आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या बघता आणि त्याची कारणं बघता आता यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे, वाहन चालकांची जनजागृती करणे यावर परिवहन विभाग भर देत आहे. गेल्या 40 दिवसात या महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. या अघपातांची कारणे देखील वेगवेगळी आहेत. 

कशामुळे झाले अपघात?

भरधाव वाहन चालत असताना टायर फुटून अपघात होणे.

रस्त्यावर आलेल्या वन्य प्राण्यांना धडकून अपघात होणे.

वाहन चालकाला झोप आल्यामुळे अपघात होणे

वाहन नादुरुस्त होऊन अपघात होणे

अति वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात

मद्य सेवन करून वाहन चालवल्यामुळे अपघात 

परिवहन विभागाच्या उपाययोजना 

अनेक कारणांमुळे समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता परिवहन विभाग आणि एमएसआरडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन चालकांवर जनजागृती करणे, टायर फुठून अपघात होऊ नये म्हणून प्रत्येक पेट्रोल पंपावर टायरमध्ये नायट्रोजन भरण्याची व्यवस्था करणे, अशा अनेक उपाय योजना आता प्रत्यक्ष समृद्धी महामार्गावर उतरून परिवहन विभागाचे अधिकारी करत आहेत. याबरोबरच टायर इंडिकेटर डेमो, रोड हिप्नॉसिस डेमो आणि वेगवेगळ्या इलेमेंटचे डेमो देण्यात येणार आहेत. 

महामार्गाच्या आजूबाजूला कुठेही हॉटेल्स किंवा ढाबा नसल्याने आता अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या छोटे-छोटे फूड स्टॉल आणि टपऱ्या आजूबाजूच्या गावातील लोकांनी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महामार्गाच्या बाजूला मोठे ट्रक आणि वाहने थांबताना दिसत आहेत. यामुळे सुद्धा अपघात वाढले आहेत. त्यामुळे परिवहन विभागाचे पोलिस आणि एमएसआरडीसीने या अनाधिकृत स्टॉल्सवर कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक ठिकाणी अशा अनधिकृत फुल स्टॉलमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 November 2024Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Embed widget