एक्स्प्लोर

Nagpur Accident : नागपूर जिल्ह्यात रस्ते अपघातांची मालिका; एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांसह पाच तरुणांचा मृत्यू

Nagpur News : जिल्ह्यातील तीन विविध घटनांमध्ये दोन सख्ख्या भावांसह पाच युवकांवर काळाने झडप घातली. विशेष म्हणजे मृतांपैकी मो. मुस्ताफाचे वय अवघे अठरा वर्ष होते. तर इतर चारही युवकही पंचविशीच्या आतील होते.

Nagpur News : नागपूर शहरासह ग्रामीण भागांतही रस्ते अपघातांची (Road Accident) संख्या वाढली आहे. अर्धवट रस्त्यांचे बांधकाम आणि पोलिसांचे वाहतुकीवरील नियंत्रणावर 'अर्थपूर्ण' दुर्लक्षामुळे नागरिकांचा बळी जात आहे. मंगळवारी (29 नोव्हेंबर) एकाच दिवसात जिल्ह्यात पाच जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. जिल्ह्यातील तीन विविध घटनांमध्ये दोन सख्ख्या भावांसह पाच युवकांवर काळाने झडप घातली. विशेष म्हणजे मृतांपैकी मो. मुस्ताफाचे वय अवघे अठरा वर्ष होते. तर इतर चारही युवकही पंचविशीच्या आतील होते.

पहिला अपघात वानाडोंगरीजवळ, दुसरा रामटेक तर तिसरा सावनेर (Saoner) तालुक्यात झाला. अपघातात ठार झालेल्या युवकांमध्ये मो. आफताब मो. इस्लाम (वय 21 वर्षे), मो. मुस्तफा इस्लाम (वय 18 वर्षे, दोघेही रा. बिहार), या सख्ख्या भावांसह लोकेश धनराज घरत (वय 23 वर्षे), आदित्य सत्यपाल कनोजिया (वय 21 वर्षे, दोघेही रा. सावनेर), विजय बागडे (वय 25 वर्षे, महादुला) या पाच जणांचा समावेश आहे.

टिप्परची धडक अन् ते कामावर पोहोचलेच नाही

मो. आफताब, मो. मुस्तफा हे दोघेही भाऊ वानाडोंगरी येथे राहायचे. ते वानाडोंगरी येथील कान्हा ऑटोमोबाईलमध्ये मोटरसायकल दुरुस्तीचे काम करायचे. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून दुचाकीने (एमएच 40, डी 6910) निघाले. वाटेत हिंगणा (Hingna) मार्गावर कल्पिक बारसमोरच्या डिव्हायडरलगत वळण घेत असतानाच हिंगण्याकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या टिप्परने (एमएच 34 एम 8811) दुचाकीला जबर धडक दिली. यात दोघेही भाऊ टिप्परच्या चाकात सापडले. अंगावरुन टिप्पर गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या अपघातात लोकेश धनराज धरत (वय 23) व आदित्य सत्यपाल कनोजिया (वय 21, दोघेही रा. सावनेर) हे (एमएच 40 केजे 8045 क्रमांकाच्या) दुचाकीचे सावनेरहून खाप्याला येत होते. कोदेगाव परिसरात त्यांनी समोर असलेल्या (एमएच 40 एके 8551 क्रमांकाच्या) टिप्परला ओव्हरटेक केले. त्यातच टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने ते चाकाखाली आले. यात एकाचा घटनास्थळीच तर दुसऱ्याचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणात एमआयडीसी आणि खापा पोलिसांनी टिप्पर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

तिसरी घटना रामटेकमध्ये

तिसरी घटना रामटेक (Ramtek) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. महादुला येथील दोन तरुण दुचाकीने (एमएच 40 सीएल 6441) गावाकडे परत येत असताना तुमसरकडून भरधाव येणाऱ्या निळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने (एमएच 49 एई 2463) शिरपूर शिवारातील हॉटेल राजमहल रिसॉर्टसमोर जोरदार धडक दिली. त्यात विजय रमेश बागडे (वय 25) आणि अक्षय हिरामण सिंदराम यांना जबर मार लागला. त्यात विजय बागडे याचा उपचारादरम्यान मेडिकल कॉलेज नागपूर येथे मृत्यू झाला. जखमी अक्षयवर उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास रामटेक पोलीस करत आहेत.

ओव्हरटेकचा प्रयत्न बेतला जिवावर

या अपघातातील दोन्ही चालकांचा मृत्यू झाला. त्या दोघांनीही दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर केला नव्हता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. खापा-कोदेगाव रोडच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने रोडच्या अर्ध्या भागाने वाहतूक सुरु आहे. त्यातच दुचाकी चालकाने टिप्परला 'ओव्हरटेक' करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न जीवावर बेतला.

ही बातमी देखील वाचा

Assembly Winter Session Nagpur : नागपूर विधानभवनातील शिवसेना कार्यालयावर पडदा; पुन्हा वादाची शक्यता?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget