एक्स्प्लोर

Nagpur Crime : नागपुरात मुले चोरणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा, पोलिस आयुक्त म्हणाले....

गेल्या काही दिवसांपासून इंदोरा, मानकापूर, जरीपटका आदी भागातील मुले चोरीला गेल्याची घटना घडली असल्याचे सांगून अनेक नागरिकांकडून व्हिडीओ फॉरवर्ड करण्यात येत आहे.

नागपूर: राज्यात मुले चोरणारी टोळी (Child stealing gang) सक्रीय झाली असल्याची अफवा आता नागपुरातही पसरली (Rumors in Nagpur) असल्याचे दिसून येत आहे. त्यातून एकीकडे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असू पोलिसांचीही डोकेदुखी वाढल्याचे दिसून येत आहे. सातत्याने सोशल मिडियावर याबाबतचे व्हिडीओ आणि संदेश व्हायरल होत असल्याने पोलिस आयुक्तांनी ट्वीट करत अशा अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर मुले चोरणाऱ्या टोळीबाबत व्हिडीओ (Viral Video) आणि संदेश व्हायरल होताना दिसून येत आहेत. यामध्ये काही ठिकाणी मुले चोरणाऱ्या टोळीला नागरिकांकडून मारहाण केल्याचेही दिसून येत आहे. यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातूनच गेल्या दोन दिवसांपासून नागपुरातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत (Video viral from last two days) अशा तक्रारी पोलिसांना मिळत आहेत. त्यामध्ये जरिपटका, पाचपावली, यशोधरानगर, गिट्टीखदान आणि मानकापूर परिसरात अशाच प्रकारे टोळीद्वारे मुले पळविण्याची अफवा पसरली आहे. पोलिसांनी याबाबत तपास केला असता, ही फक्त अफवा असल्याचे आढळून आले. मात्र, सातत्याने अशा प्रकारच्या अफवांनी शहरात एकच खळबळ माजली असल्याचे चित्र आहे.

पोलिस आयुक्तांकडून व्हिडीओची दखल

शहरात व्हिडीओ आणि संदेशाच्या माध्यमातून मुले चोरणाऱ्या टोळीबाबत अफवा पसरविण्यात येत असल्याने अशी कुठलीही टोळी (police commissioner nagpur message to citizen) नसून त्यावर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. याशिवाय मुलांच्या सुरक्षिततेबाबत शहर पोलिसांद्वारे प्राधान्यक्रमाने आवश्‍यक त्या उपाययोजना नेहमीच केल्या असून नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

नागरिकांनी सतर्क राहावे

सोशल मिडियाच्या माध्यमातून येणारे कुठलेही व्हिडीओ, ऑडिओ, लिंक आणि संदेश व्हायरल (don't spread fake messages ) करू नका असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात आले असून असे संदेश आल्यास पोलिसांना कळवावे. अशाप्रकारे अफवा पसरविणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंदोरा, मानकापूर, जरीपटका आदी भागातील मुले चोरीला गेल्याची घटना घडली असल्याचे सांगून अनेक नागरिकांकडून व्हिडीओ फॉरवर्ड करण्यात येत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime : नागपुरात चक्क तरुणीकडून चैन स्नॅचिंगचा प्रयत्न, सोबतची तरुणीही नशेत धुंद

गौप्यस्फोट! 'दसरा मेळावा शिवाजीपार्कवर घेण्याच्या भानगडीत पडू नका; राज ठाकरेंनी दिला होता मुख्यमंत्र्यांना सल्ला'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेसWorli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोशWorli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखलSupriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget