Nagpur Crime : नागपुरात चक्क तरुणीकडून चैन स्नॅचिंगचा प्रयत्न, सोबतची तरुणीही नशेत धुंद
Nagpur Crime : धंतोली पोलिस (Dhantoli Police Station) ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चैनस्नॅचिंगचे प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.
नागपूरः गेल्या अनेक वर्षांपासून शहरात चेनस्नॅचिंगच्या घटना घडत असताना त्यात मोजक्याच आरोपींना अटक होते. तर अनेक घटनेतील आरोपी अजूनही मोकाट आहे. मात्र पोलिसांच्या हाती लागलेले चैनस्नॅचिंग बहुतांश आरोपी हे पुरुष असतात. शुक्रवारी सायंकाळी धंतोली पोलिस (Dhantoli Police Station) ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चैनस्नॅचिंगचे प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. रामकृष्ण पार्कजवळ या दोन्ही तरुणींनी दुचाकीवरुन (Girl Chain Snatching bike) येत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. शहरातील तरुणींकडून अशाप्रकारे चोरी करण्याची ही पहिलीच घटना असल्याची चर्चा आहे.
महिलेच्या समयसूचकतेमुळे पकडल्या तरुणी
महिलेच्या समयसूचकतेमुळे या दोघींना पकडण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत असलेली लुटमार करणारी दुसरी तरुणी चक्क मद्याच्या नशेत धुंद होती. अरुंधती देवेंद्र तगनपल्लीवार (वय 53, रा. विवेकानंदनगर, धंतोली) या सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास धंतोली (Dhantoli) परिसरातील रामकृष्ण पार्क समोरून फिरत होत्या. यावेळी त्यांना मागून दुचाकीवरुन येणाऱ्या 20 ते 22 वयोगटातील दोन तरुणींनी आवाज दिला. त्यामुळे त्यांनी मागे वळून बघताच, त्यांच्या गळ्यातीळ सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अरुंधती यांनी समयसुचकता दाखवित, मागे बसलेल्या तरुणीचा हात पकडला आणि ओढले. त्यामुळे ती दुचाकीवरुन पडली. अरुंधती यांनी आरडाओरड केल्याने पळून जाणाऱ्या दुसऱ्या तरुणीला नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभा एकुर्ले यांनी घटनास्थळ गाठले. दोन्ही तरुणींना ताब्यात घेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत, त्यांना अटक केली आहे.
तरुणी दारुच्या नशेत?
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दोन तरुणींपैकी एक तरुणी दारुच्या नशेत धुंद असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, यापैकी एक तरुणीवर गुन्हा दाखव असून गुन्ह्यातील इतिहासही आहे. तिचा भाऊ आणि आई हे दोघेही विविध गुन्ह्यात कारागृहामध्ये (Brother in Jail) शिक्षा भोगत आहे. मात्र, आजपर्यंतच्या इतिहासात मुलींकडून असा प्रकार केल्याची पहिलीच घटना असल्याचे दिसून येत आहे.
मंगळसुत्रही निघाले 'नकली'
सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न करताना अडकलेल्या तरुणींनी जे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात ते मंगळसुत्रही नकली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकारात 'खाया पिया कुछ नही गिलास तोडा बारा आणा' असाच प्रकार झाल्याचे दिसून आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या