Nagpur ZP Elections : पुढील आठवड्यात जाहीर होणार झेडपीचा निवडणूक कार्यक्रम; अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड या तारखेला
3 महिन्यांची मुदतवाढ 17 ऑक्टोबरला संपुष्टात येत आहे. तत्पूर्वी अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवडणूक घेणे आवश्यक आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबरपूर्वी या दोन्ही पदासाठी निवडणूक होणार असल्याचे सांगण्यात येते.

Nagpur Zp Election News: नुकतेच जिल्हा परिषदेच्या (ZP) अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (Reservation) राखीव ठेवण्यात आले. तीन महिन्याची मुदतवाढ 17 ऑक्टोबर रोजी संपत असल्याने त्यापूर्वीच निवडणुका होणार असल्याचे सांगण्यात येते. 2020मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन 18 जानेवारी 2020 रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. अध्यक्ष पद हे अनुसूचित जातीतील महिलेसाठी राखीव असल्याने या पदावर कॉंग्रेसच्या रश्मी बर्वे यांची वर्णी लागली. तर उपाध्यक्षपदी माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांचे खंदे समर्थक मनोहर कुंभारे निवड झाली होती.
...म्हणून सदस्यांचे सदस्यत्व रद्द
आरक्षणाची टक्केवारी 50 टक्क्यांवर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील (OBC Reservation) सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. 16 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. यामध्ये उपाध्यक्ष मनोबर कुंभारेंचाही समावेश होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने या 16 जागांचा खुल्या प्रवर्गात समावेश करुन निवडणुका घेतल्या. केळवद सर्कल हा महिलांसाठी आरक्षित झाल्याने मनोहर कुंभारेंच्या पत्नी व विद्यमान उपाध्यक्षा सुमित्रा कुंभारेंना रिंगणात उतरविले. त्यांचा विजयही झाला उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली.
जुलैमध्येच संपला होता कार्यकाळ
गत 17 जुलै 2022 रोजी विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला. परंतु ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण निघाले नाही. परिणामी प्रशासनाकडून 16 जुलैला उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याचा कार्यक्रमही जाहीर केला होता. परंतु तत्पूर्वीच शासनाने तीन महिन्याची मुदतवाढ दिली. नुकतेच शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पुढील अध्यक्ष अनुसूचित जमाती प्रवर्गात राहणार हे निश्चित झाले. तीन महिन्यांची मुदतवाढ 17 ऑक्टोबरला संपुष्टात येत आहे. त्यामुळे तत्पूर्वी अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवडणूक घेणे आवश्यक आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबरपूर्वी या दोन्ही पदासाठी निवडणूक होणार असल्याचे सांगण्यात येते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nagpur News : नागपूर-वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलावर नारायण राणेंच्या विभागाकडून बॅनरबाजी, दुचारीस्वारांचे जीव धोक्यात
Shashi Tharoor : अध्यक्षपदाची निवडणूक म्हणजे आमच्या सहकाऱ्यांमध्ये होत असलेली प्रक्रिया, युद्ध नाही : शशी थरूर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
