एक्स्प्लोर
नागपुरात जिल्हा निवडणूक यंत्रणेचा हलगर्जीपणा, मतदान कार्ड मतदारांऐवजी कार्यकर्त्यांकडे
नव्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने बनविलेले मतदान कार्ड निवडणूक यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या हाताने नव्हे तर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हाताने मतदारांच्या घरी पाठवण्याचा प्रताप जिल्हा निवडणूक यंत्रणेने केला आहे.

नागपूर : नागपूरात नव्या मतदारांच्या मतदान कार्डांबद्दल जिल्हा निवडणूक यंत्रणेचा अक्षम्य बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे. नव्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने बनविलेले ओळखपत्र निवडणूक यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या हाताने नव्हे तर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हाताने मतदारांच्या घरी पाठवण्याचा प्रताप जिल्हा निवडणूक यंत्रणेने केला आहे.
रामटेक लोकसभा मतदार क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या वाडी परिसरात नव्या मतदारांना नुकतंच निवडणूक आयोगाने तयार केलेले रंगीत मतदान कार्ड मिळाले. नियमाप्रमाणे हे नवीन मतदान कार्ड बूथ लेव्हल ऑफिसर म्हणजेच बीएलओ (BLO)यांनी मतदारांच्या घरी जाऊन देणे अपेक्षित होते. मात्र शेकडो मतदारांच्या घरी हे नवीन मतदान कार्ड शिवसेनेचे पदाधिकारी घेऊन पोहोचले.
मतदारांच्याऐवजी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हातात हे मतदान कार्ड गेल्यामुळे मतदार ही गोंधळात पडले. या हलगर्जीपणाबद्दल काहींनी आक्षेप घेतले, तेव्हा हे प्रकरण चव्हाट्यावर आले.
त्यानंतर या प्रकाराबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना विचारणा केली. जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रकाराबद्दल चौकशी सुरु केली आहे. जर चौकशीत निवडणूक यंत्रणेशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघडकीस आला तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
