एक्स्प्लोर

वाघिणीसारखी झडप घालून चोरट्याला पकडलं, विदर्भ क्रिकेट संघाची यष्टीरक्षक सलोनीच्या धाडसाचं कौतुक

मध्यरात्री घरा घुसलेल्या चोरट्याचा धाडसाने सामना करत त्याला पकडून दिल्याचा पराक्रम एका तरुणीने केला. सलोनी अलोट नावाची तरुणी विदर्भ महिला क्रिकेट टीमची यष्टीरक्षक आहे. घरात घुसून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यावर वाघिणीसारखी झडप घालत सलोनीने त्याला पकडलेच नाही, तर मदत येईपर्यंत पुढील 10 मिनिटं त्याच्यासोबत संघर्ष करत त्याला पोलिसांना सोपवलं.

नागपूर : विदर्भ महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक सलोनी अलोटच्या धाडसाचं नागपूर पोलिसांसह सगळेच कौतुक करत आहेत. याचं कारण म्हणजे तिने दाखवलेलं धाडसं. मध्यरात्री घरात घुसून चोरी केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यावर तिने वाघिणीसारखी झडप घातली आणि मदत येईपर्यंत दहा मिनिटं संघर्ष करत त्याला जखडून ठेवलं. यानंतर सलोनीने त्याला पोलिसांच्या स्वाधीनही केलं. नागपुरात शनिवारी (22 फेब्रुवारी) ही घटना घडली. काय घडलं शनिवारी रात्री? 24 वर्षीय सलोनी अलोट तिच्या आई-वडिलांसोबत नागपुरातील गिट्टीखदान परिसरातील स्वामी कॉलनीत राहते. शनिवारी रात्री ती कारने आई-वडिलांसह आपल्या मामाकडे गेली होती. रात्री दीड वाजता परतले तेव्हा घराच्या आवारात कोणी तरी शिरल्याची चाहूल तिच्या आई-वडिलांना लागली. सलोनी घरासमोर कार पार्क करत होती. आई-वडील बाहेरचा मेन गेट उघड असताना एका चोरट्याने घरातून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. सलोनीच्या आई-वडिलांनी तिला हाक मारली. त्यावेळी कम्पाउंड वॉलवरुन उडी मारुन पळून जाणाऱ्या चोरट्याला सलोनीने बाहेर रस्त्यावर झडप घालून पकडले. दोघांमध्ये बरीच झटापट झाली. चोरट्याने तिथे असलेल्या विटा आणि दगडांनी सलोनीवर वार करण्याचे प्रयत्न केले. मात्र, सलोनीने त्याच्यावरील पकड सैल केली नाही. आई-वडिलांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलावलं. शेजारी काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले आणि नंतर पोलिसांना बोलावून चोराला त्यांच्या स्वाधीन केले. धनराज पंचेश्वर असं चोरट्याचं नाव असून तो मध्य प्रदेशातील बालाघाटचा आहे. पोलिसांच्या रेकॉर्ड अनुसार तो सराईत चोर असून त्याने अनेक घरांमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. पोलीस अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते. मात्र, शनिवार रात्री तो सलोनीच्या हातात लागला आणि त्याला पकडण्यात पोलिसानं यश आले आहे. त्याच्याकडून घरफोडीचं साहित्यासह लोखंडी रॉड पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी सलोनीचे आभार मानत तिच्या या धाडसाचे कौतुक केले आहे. चोरट्याच्या हातात शस्त्रही असू शकते, अशा स्थितीत अंधारात मोकळ्या हाताने चोरट्याचा सामना करण्यासाठी खूप हिंमत लागते. मात्र, रणरागिरीनी सलोनीने अचाट धैर्य आणि हिंमत दाखवत त्याचा सामनाच केला नाही, तर त्याला नामोहरम करत पोलिसांच्या स्वाधीन ही केलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget