(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Blast : स्फोटात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
Nagpur Blast : सोलर इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य राज्य सरकारकडून 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.
नागपूर : नागपुरात (Nagpur) सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) भेट दिली. तसेच या घटनेच्या सखोल चौकशीचे देखील आदेश देण्यात आल्याचं यावेळी फडणवीसांनी म्हटलं. राज्य सरकारकडून (Government) मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच कंपनीकडून सुद्धा 20 लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केल्याचं सांगण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत ही माहिती दिली.
नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे ही कंपनीत आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाला आहे. तसेच, या स्फोटात अनेक मजूरही गंभीररित्या जखमी झाले आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं?
सोलर इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची सुद्धा भेट घेतली. त्यांना सांत्वना दिली. अतिशय दुर्दैवी अशा या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आलेली आहे. कंपनीकडून सुद्धा 20 लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली आहे. या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही दिली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
🕟 4.30pm | 17-12-2023📍 Nagpur | संध्या. ४.३० वा. | १७-१२-२०२३ 📍 नागपूर
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 17, 2023
सोलर इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची सुद्धा भेट घेतली. त्यांना सांत्वना दिली.
अतिशय दुर्दैवी अशा या घटनेची सखोल चौकशी करण्यात… pic.twitter.com/UcDQ1bnLpz
नेमकं काय घडलं?
नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे ही कंपनी असून आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. निर्माण झालेले स्फोटक पॅकिंग करण्याचं काम सुरू असताना हा स्फोट झाल्याचं सांगण्यात आलं. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी आणि गंभीर होती की, त्यामध्ये अनेज मजूर गंभीर जखमी झाले. तसेच 9 जणांचा मृत्यू झाला.
हेही वाचा :
Nagpur News: नागपूर-अमरावती रोडजवळील बाजार गावात सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट; 9 जणांचा मृत्यू