एक्स्प्लोर

Nitin Gadkari : सरकारच्या चालणाऱ्या कामांना अधिकारी पंक्चर करतात, फायलींना दाबून ठेवणं योग्य नाही : नितीन गडकरी 

सरकारच्या चालणाऱ्या कामांना अधिकारी पंक्चर करतात. फायलींना दाबून ठेवणे योग्य नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल ओळखले जातात सोबतच ते सरकारी अधिकाऱ्यांना आणि खडेबोल सुनावण्यासाठी सर्वश्रुत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा सरकारी अधिकाऱ्यांना सुनावले. सरकारच्या चालणाऱ्या कामांना अधिकारी पंक्चर करतात. फायलींना दाबून ठेवणे योग्य नसल्याचे गडकरी म्हणाले. आमच्या सरकारमध्ये फायनान्शिअल ऑडिट जेवढं महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा परफॉर्मन्स ऑडिट हे अधिक महत्त्वाचं असल्याचे ते म्हणाले.

सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना मंत्री नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना सुनावले. आमच्या सरकारमध्ये फायनान्शिअल ऑडिट जेवढं महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा परफॉर्मन्स ऑडिट हे अधिक महत्त्वाचं आहे. आमचे चुकीचे निर्णय लोकांना नाहक त्रास देतात. ज्यामुळं लोकांच्या जीवनात कारण नसतानाही समस्या वाढतात असे गडकरी म्हणाले. मी इन्कम टॅक्सची एक केस पाठवली, एका पती-पत्नीने फ्लॅट विकत घेण्यासाठी बँकेतून कर्ज घेतलं, कर्जामध्ये एक एन्ट्री झाली आणि एक झालीच नाही, तर इन्कम टॅक्स विभागाने इन्कम समजून चाळीस लाखांचा टॅक्स लावून दिला. अगोदरच कर्जाचे हप्ते देणे त्यांच्यासाठी सोपं नव्हतं अशात अगोदरच चौकशी केली असती तर टॅक्सची रक्कम लावण्यात आली नसती असे उदाहरण देखील त्यांनी सांगितले. 

कधी कधी अधिकाऱ्यांच्या छोट्या कामामुळं देशाचं नुकसान

कधी कधी अधिकाऱ्यांच्या छोट्या कामामुळं देशाचं नुकसान होतं आणि जनतेलाही त्रास सहन करावा लागतो असे गडकरी म्हणाले. तुम्ही जे सरकारच्या रोजगारात चालले आहेत त्यांना मी असं म्हणतो की तुमचं परफॉर्मन्स ऑडिट हे अधिक महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. काही लोक असे असतात जे केवळ कायदे आणि नियमांच्या गोष्टी करतात. पण नियमांचं अर्थ असा असतो की लेटर आणि स्पिरिटमध्ये डिफरन्स आणि नियमांच्या  स्पिरीटला जे समजत नाही ते काम नाही करु शकत. मी मोठमोठ्या अधिकाऱ्यांना म्हणतो की तुम्ही विआरएस (स्वेच्छा निवृत्ती) का नाही घेत? तुम्ही विभागात आले नाही तरी आमचे काम अधिक गतीने होईल. तुम्ही आल्याने समस्या निर्माण होतात, चालणाऱ्या कामांना तुम्ही पंक्चर करता असे गडकरी म्हणाले.  

फाईलला दाबून ठेवणं योग्य नाही

स्वाभाविकपणे पॉझिटिव्हिटी ट्रान्सपरन्सी आणि टाईम बाऊंड डिसिजन मेकिंग हे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये जरुर लक्षात ठेवा. जे लोक वेळेत काम पूर्ण करतात ते मला आवडतात असेही गडकरी म्हणाले. आमच्याकडे  डिपार्टमेंटमध्ये एक खूप मोठे अधिकारी आहेत. आयआयटीएन आहेत, कोणतीही फाईल त्यांच्याकडे गेली की ते तीन महिने त्याचा अभ्यास करतात. मी त्यांना सांगितले एक रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, त्याचे डायरेक्टर म्हणून जा, इथे तुमची गरज नाही असे गडकरी म्हणाले. फाईलला तीन-तीन चार-चार महिने दाबून ठेवनं हे योग्य नसल्याचे गडकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget