Nagpur News : नागपूरच्या डॉलीची बिल गेट्स यांना भुरळ; सोशल मिडियावरील रिल प्रचंड व्हायरल
Nagpur News : आपल्या हटक्या स्टाईलने नागपूरसह देशभर प्रसिद्ध असलेल्या डॉलीच्या टपरीवर स्व:ता बिल गेट्स चायचा आनंद घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मिडिवार तूफान वायरल होतो आहे.
Nagpur News नागपूर: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. नुकताच त्यांनी या दौऱ्यावरचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्या हटक्या स्टाईलने नागपूरसह (Nagpur News) देशभर प्रसिद्ध असलेल्या डॉलीच्या टपरीवर (Dolly Chaiwalla) स्वतः बिल गेट्स चायचा आनंद घेत असल्याचे दिसून आले आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला बिल गेट्स हे डॉलीच्या स्टॉलवर जाऊन 'वन चाय प्लीज' असे म्हणताना दिसत आहे. नुकतेच बिल गेट्स (Bill Gates ) यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यानंतर अल्पावधीतच हा व्हिडिओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे.
नागपूरकर डॉलीच्या चायची बिल गेट्स यांना भुरळ
'भारतात, तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला नावीन्य पाहयला मिळेल, अगदी साधा कपभर चहा तयार करतानाही!' असं कॅप्शन देत बिल गेट्स यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ आहे नागपूरातील सदर परिसरात असणाऱ्या प्रसिद्ध 'डॉली चहावाला' याचा. चहा तयार करताना डॉलीची हटके स्टाईल आणि डायलॉग बघून साऱ्यांना त्याची अद्भुत अंदाजाची भुरळ पडते. त्याचे व्हिडीओ आणि रिल्स सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सोबतच त्याचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. आता त्यात मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांची देखील भर पडली आहे. गेट्स यांना देखील सोशल मिडियाच्या माध्यमांतूनच त्याच्याबाबत कळाले आणि त्यांनी एका हिल स्टेशनवर त्याला आमंत्रित केले. डॉलीने तेथेच एका हातठेल्यावर स्टोव्ह मांडून गेट्स यांच्या डोळ्यासमोर आपल्या खास शैलीत चहा तयार केला. गेट्स त्याची प्रत्येक लकब आणि चहा बनविण्याची स्टाईलमुळे बिल गेट्स देखील भारावून गेले.
'वन चाय प्लीज'
व्हिडीओच्या सुरुवातीलाच गेट्स 'वन चाय प्लीज' असे म्हणताना दिसतात आणि व्हिडीओत भारतात परत आल्याने रोमांचित असल्याचे देखील गेट्स यांनी नमूद केले आहे. व्हिडिओच्या टेक्स्टमध्ये बिल गेट्स यांनी लिहिलं की, पुन्हा भारतात आल्याने मी उत्साहित आहे. जे अनोख्या इनोव्हेशनचं घर आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 19.2 मिलियन लोकांनी पाहिलं असून या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स आल्या आहेत. बुधवारी सायंकाळपासूनच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हा व्हिडीओ बघून नागपूरकरांसह अनेकांना मोठा सुखद धक्का बसला आहे. हा व्हिडीओ वायरल होताच अनेकांनी आता डॉलीच्या टपरीकडे धाव घेतली असल्याचे चित्र आहे.
इतर महत्वाच्या बातम्या