आरोग्यसेवक परीक्षेचा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप, नागपुरातल्या जी. एच. रायसोनी महाविद्यालयातले व्हीडीओ व्हायरल
पेपरचा गठ्ठा वर्गात येण्यापूर्वीच त्याचे सील फोडण्यात आले असल्याचे आरोप व्हायरल झालेल्या व्हिडीओ विद्यार्थ्यांनी केला आहे.
नागपूर : राज्यात काल आरोग्यसेवक, लॅब असिस्टंटसाठी परीक्षा घेण्यात आल्यात. मात्र, नागपूरच्या जी एच रायसोनी महाविद्यालयातील सेंटरवर पेपर फुटल्याचा आरोप परीक्षार्थीनी केला आहे. नागपूरसह राज्यात अनेक ठिकाणी काल आरोग्यसेवक, लॅब असिस्टंट अशा 54 वेगवेळ्या पदासाठीच्या 3 हजार 277 हजार जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. पेपरचा गठ्ठा वर्गात येण्यापूर्वीच त्याची सील फोडण्यात आले असल्याचे आरोप व्हायरल झालेल्या व्हिडिओ परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केला आहे.
बंद लिफाफ्यात असलेला पेपर वर्गखोलीत येऊन फोडणे अपेक्षित असताना अगोदरच सील फोडल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले, त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी संपूर्ण घटनाक्रमाचे व्हिडीओ बनवत ते व्हायरल केले आहे. पेपर हे अगोदर केव्हा फोडले, का फोडले, कोणाच्या मदतीसाठी फोडले? असे सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांनी त्यासंदर्भात नागपूरच्या पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार ही दिली आहे.