एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nagpur Hit And Run : राज्याच्या उपराजधानीत नेमकं चाललंय काय? पुन्हा हिट अँड रनच्या घटनांनी नागपूर हादरलं, 48 तासांत 6 जणांनी गमावले प्राण

Nagpur News: गेल्या 48 तासांत झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एकूण 6 नगरिकांचा मृत्यू झाला आहे. ज्यात मृत्यू झालेले पाचजण हे 30 वयोगटाच्या खालचे आहेत. 

Nagpur Hit And Run : नागपूर : राज्याच्या उपराजधानीत नेमकं चाललंय काय? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. नागपूरच्या (Nagpur Crime) आणखी दोन वेगवेगळ्या हिट अँड रनच्या (Hit And Run) घटना समोर आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, काल (मंगळवारी) नागपुरातील वेगवेगळ्या भागांत हिट अँड रनच्या (Nagpur Hit And Run) दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये  दोघांचा मृत्यू झालाय.

नागपूर सलग दुसऱ्या दिवशी दोन वेगवेगळ्या हिट अँड रनच्या घटना पुढे आल्या आहेत. ज्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली, ज्यात भावेश भरणे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तरुण दुचाकीनं जात असताना ट्रकनं धडक दिल्यानं त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. तर दुसरी घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. प्रकाश महंत हा भांडेवाडी परिसरातून तरुण पाई जात असताना अज्ञात वाहनानं त्याला धडक दिली त्यात त्याचा मृत्यू झाला. गेल्या 48 तासांत झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एकूण 6 नगरिकांचा मृत्यू झाला आहे. ज्यात मृत्यू झालेले पाचजण हे 30 वयोगटाच्या खालचे आहेत. 

गेल्या काही दिवसांत हिट अँड रनच्या घटनांनी संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. पुणे पोर्शे अपघातानंतर (Pune Porsche Accident) संपूर्ण राज्यभरातील हिट अँड रनच्या घटनांनी काळजाचा ठोका चुकवला आहे. एकीकडे मुंबईतील हायप्रोफाईल हिट अँड रनच्या घटनेनं संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. तर, दुसरीकडे नागपुरात एकापाठोपाठ एक होणाऱ्या हिट अँड रनच्या घटनांनी प्रशासनाचंही टेन्शन वाढवलं आहे. 

एका वृद्धाला भरधाव बसनं चिरडलं 

नागपुरात सायकलवरुन जात असताना मंगळवारी एका 60 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला एका भरधाव बसनं धडक दिली. व्यक्तीचा तोल जाऊन व्यक्ती खाली कोसळली. बस भरधाव असल्यामुळे सायकलवरुन पडलेली वृद्ध व्यक्ती बसच्या चाकाखाली आली. या अपघातात व्यक्ती गंभीर जखमी झाली. जखमी व्यक्तीला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. पोलिसांना सदर बसची ओळख पटली असून बसचालकाचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 

गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात घडला असून कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये दिनेश खैरनार या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतही हिट अँड रनची घटना घडली. तसेच मॉर्निंग वॉक करणाऱ्या प्रवीण गांधी या रेल्वे अधिकाऱ्याला कारनं उडवलं आहे. दोन्ही घटनांमध्ये चालक घटनेनंतर फरार झाल्याचं समोर आलं आहे. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Banner Ayodhya : अयोध्यावासीयोंकी हैं पुकार, शिंदेजी बने मुख्यमंत्री फिर एकबारRahul Gandhi on Adani | लाखो कोटींचा आरोपी, गौतम अदानींना अटक करा; राहुल गांधींची मागणीSudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम फेर मतमोजणीची मागणीABP Majha Headlines :  12 PM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Embed widget