एक्स्प्लोर

Nagpur Crime : 6 ते 7 जण गाडीतून उतरले अन् टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर सपासप वार केले; थरारक घटनेने नागपूर हादरलं

Nagpur Crime : नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीवनगर बसस्टॉपजवळ पान टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला.

नागपूर : नागपूरच्या (Nagpur) एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीवनगर बसस्टॉपजवळ पान टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. कारमध्ये बसून आलेल्या सात ते आठ अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करुन पळून गेले. ही घटना बुधवारी (16 ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. 

राकेश मिश्रा (वय 27 वर्षे) आणि रवी जयस्वाल (वय 28 वर्षे) दोघेही रा राजीवनगर, हिंगणा रोड नागपूर अशी जखमी झाले आहेत. मात्र खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान राकेशचा मृत्यू झाला. दोघेही या भागात आरटीओशी संबंधित कागदपत्रे तयार करण्याचे काम करत होते अशी माहिती आहे. 

टपरीवर बसलेल्या मित्रांवर सपासप वार 

दररोज सायंकाळी ते बसस्टॉपवर येऊन बाजूला एका टपरीवर बसायचे. रात्री पण तिथे बसून असताना काही अंतरावर कारमधून 6 ते 7 जण उतरले. त्यांनी तोंडाला दुपटे बांधले होते. राकेश आणि रवीच्या जवळ येऊन त्यांनी धारदार हत्याराने सपासप वार सुरु केले. राकेश हा जखमी होऊन जागीच निपचित पडला. तर रवी हा जीव वाचवण्यासाठी बाजूला असलेल्या एका महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये घुसला आणि काचेचे केबिन आतून बंद करुन घेतले. आरोपी त्याचा पाठलाग करत तिथे पोहोचले. त्यांनी काचेची केबिन फोडून आतमध्ये घुसून रुग्ण आणि डॉक्टर समोरच त्यालाही गंभीर जखमी केले आणि  कारमध्ये बसून फरार झाले.

हल्ल्याचं कारण अस्पष्ट

एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार भीमा नरके आणि स्टाफ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. हा हल्ला नेमका कशासाठी झाला हे कळू शकलेलं नाही. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा

Nagpur Crime : नागपुरात 24 तासात दोन हत्या, दोन्ही घटनांमध्ये पतीने पत्नीला संपवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला घरी बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला घरी बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suryakumar Yadav Vidhanbhavan : कॅच बसला हातात! सूर्याकुमार यादवचं विधानभवनात मराठीतून भाषणRohit Sharma Marathi speech : सूर्याच्या हातात बॉल बसला,नाहीतर त्याला बसवला असता, रोहितचं मराठी भाषणTeam India Meet CM Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वविजेत्यांचा सत्कार, वर्षा निवासस्थानी भेटAditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संताप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला घरी बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला घरी बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
सावधान! 'या' 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर ठिकाणी कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? 
सावधान! 'या' 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर ठिकाणी कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? 
Embed widget