एक्स्प्लोर

Nagpur Crime : हत्येच्या घटनांनी नागपूर जिल्हा हादरला, एकाच दिवसात चार जणांचा खून

Nagpur Crime : मागील 24 तासात नागपूर शहरात दोन तर नागपूर ग्रामीण परिसरात दोन हत्या झाल्या. एकाच दिवसात चार हत्यांच्या घटनेने नागपूर जिल्हा हादरला आहे.

Nagpur Crime : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरची (Nagpur) ऑरेंज सिटी अशी ओळख आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून क्राईम सिटी (Crime City) अशी ओळख देखील नागपूरने निर्माण केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच मागील 24 तासात म्हणजेच एका दिवसा नागपूर जिल्ह्यात चार हत्या (Murder) घडल्या. त्यामुळे क्राईम सिटी ही ओळख अधिक गडद होतेय की काय असं चित्र निर्माण झालं आहे.

मागील 24 तासात नागपूर शहरात दोन तर नागपूर ग्रामीण परिसरात दोन हत्या झाल्या. एकाच दिवसात चार हत्याच्या घटनेने नागपूर जिल्हा हादरला आहे. पहिल्या घटनेत भावानेच आपल्या मनोरुग्णा बहिणीची हत्या केली. तर दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलाने 40 वर्षीय इसमाची हत्या केली. आणखी एका घटनेत पैशांच्या वादातून दोन तरुण व्यापाऱ्यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या तिन्ही प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांकडून (Nagpur Police) सुरु आहे.

पहिली घटना 

एका सख्ख्या भावाने मनोरुग्ण बहिणीची हत्या केल्याची घटना नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. मोना उर्फ खुखी किरण चौधरी (वय 38 वर्षे)असं मृत बहिणीचं नाव आहे. तर सुरज उर्फ बाल्या लक्ष्मण रक्षक (वय 50 वर्षे) असं आरोपी भावाचं नाव आहे. नंदनवनमधील पाडोले नगरमधीन हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बहिणीच्या आजारपणाला कंटाळून त्याने तिची हत्या केली असावी असा संशय पोलिसांना आहे. 

दुसरी घटना 

हत्येची दुसरी घटना जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मोतीबाग परिसरात घडली. इथे अल्पवयीन मुलाने कचरा वेचणाऱ्या शेखर नावाच्या ४० वर्षीय इसमाची हत्या केली. या अल्पवयीन मुलाने संबंधित इसमावर तलवारीने 15 वार करुन त्याला जीवे मारलं. या घटनेप्रकरणी जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तिसरी आणि चौथी घटना

नागपूर इथून बेषत्ता दोन जणाची कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिगणाबोडी शिवारातील एका फार्म हाऊसमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर दोघांचे मृतदेह अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकण्यात आले. हत्या झालेले दोघे व्यापारी असल्याचं समजतं. उधारीच्या पैशांच्या वादातून दोन तरुण व्यापाऱ्यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्या माहिती समोर आली आहे. नागपुरातील बर्डी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

हेही वाचा

Nagpur Crime : माहेरी राहणारी पत्नी आजारी पतीची काळजी घेण्यासाठी परतली, मात्र पतीनेच तिला संपवलं, रात्रभर मृतदेहाशेजारी बसून राहिला

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Best Bus Driver Viral Video : धक्कादायक! बस थांबवून दारू घेतली.. BEST बस चालकाचा प्रताप FULL VIDEOZero Hour  INDIA Alliance Leadership : इंडिया आघाडीतील संघर्षाचा मविआवर परिणाम?ABP Majha Headlines : 11 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Priyanka Chaturvedi : इंडिया आघाडीच्या नेतृत्त्वाच्या मुद्द्यावर ठाकरे कुणाच्या बाजूने?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
Embed widget