(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime : माहेरी राहणारी पत्नी आजारी पतीची काळजी घेण्यासाठी परतली, मात्र पतीनेच तिला संपवलं, रात्रभर मृतदेहाशेजारी बसून राहिला
Nagpur Crime : आजारी पतीची काळजी घेण्यासाठी घरी परतलेल्या पत्नीची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी पत्नीच्या मृतदेहाशेजारी रात्रभर बसून होता.
Nagpur Crime : आजारी पतीची काळजी घेण्यासाठी घरी परतलेल्या पत्नीची हत्या केल्याची घटना नागपुरात (Nagpur) घडली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी पत्नीच्या मृतदेहाशेजारी रात्रभर बसून होता. दरम्यान पोलिसांनी आरोपी पतीला मंगळवारी (18 जुलै) अटक केली. रमेश असं आरोपीचं नाव आहे.
आरोपी पतीकडून पत्नीच्या चारित्र्यावर संशय
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अर्चना भारस्कर ही तिशीतील महिला आरोपी रमेश याच्यापासून काही काळ वेगळी राहत होती. रमेश वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. यालाच कंटाळून अर्चना भारस्कर माहेरी निघून गेली होती. रमेश आजारी असल्याने त्याची काळजी घेण्यासाठी अर्चना भारस्कर ही चार महिन्यांपूर्वीच परतली होती.
रात्रभर पत्नीच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला
नागपुरातील झोपडपट्टीत ते राहत होते. सोमवारी (17 जुलै) आरोपी रमेशने पत्नी अर्चना भारस्करची हत्या केली. त्यांनतर हत्येची कबुली देण्यासाठी नातेवाईकांना बोलावण्यापूर्वी त्याने संपूर्ण रात्र तिच्या मृतदेहाशेजारी घालवली, अशी माहिती त्याच्या कुटुंबांतील सदस्यांनी दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र नाईकवाड म्हणाले की, रमेशला त्याचा मोठा भाऊ अशोक याने शेजारच्या परिसरात फिरताना पाहिलं होतं. आरोपीने हत्येची कबुली देण्यासाठी बोलावलेल्या नातेवाईकाने अशोकला संबंधित प्रकार सांगितला.
सततच्या भांडणाला कंटाळून पत्नीपासून दूर राहण्याचा निर्णय
अर्चना भारस्कर ही रमेशची दुसरी पत्नी होती. त्या दोघांना दोन मुली आहेत. रमेशला दारुचं व्यसन होत. लग्नाच्या दोन वर्षांनंतर दोघांमध्ये भांडणं सुरु झाली. रमेश सातत्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. इतकंच नाही तर आपण मुलींचा बाप नसून मुली दुसऱ्याच कोणाच्या तरी असल्याचं बोलत असे. चारित्र्यावर सतत प्रश्न उपस्थित केल्याने आणि भांडणांमुळे संतापलेल्या अर्चनाने पती रमेशला सोडलं आणि अकोल्यातील आपल्या माहेरी राहायला गेली. तिथे ती घरकाम करत होती. तिच्यासोबत तिची मोठी मुली पूजा होती. तर तिची धाकटी मुलगी स्वरा ही दुसऱ्या नातेवाईकाच्या घरी राहते.
पोल्ट्रीमध्ये नुकसान झाल्याने अर्चनाचा नवरा रमेश बेरोजगार झाला होता. त्यानंतर त्याने जमा असलेले पैसे दारुवर उडवायला सुरुवात केली. आजापण वाढल्याने आणि प्रकृती गंभीर झाल्यानंतर रमेशने अर्चनावर परत येण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. अखेर चार महिन्यांपूर्वी अर्चना पतीकडे परतली होती. परंतु आरोपी रमेशने तिची हत्या केली.
हेही वाचा
Nagpur Crime : इन्स्टाग्रामवर मैत्रिणीला मेसेज केल्यावरुन वाद, नागपुरात भरदिवसा तरुणाची हत्या