Nagpur Crime News: प्रेयसीनेच त्याला संपवलं; लग्नाचा वाद अन् टोकाचं पाऊल, नागपुरातील तरूणाच्या हत्येचं गूढ उकललं
Nagpur Crime News: बालाजी कल्याणे या 28 वर्षीय तरुणाची हत्याच झाली असून त्याच्या मैत्रिणीने त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

नागपूर: नागपूरच्या नंदनवन कॉलनीत भाड्याने राहणारा बालाजी कल्याणे हा 28 वर्षीय तरुण त्याच्या खोलीत संशयास्पदरित्या (Nagpur Crime News) मृतावस्थेत आढळला होता, तर तेथेच त्याची मैत्रीण देखील रक्तबंबाळ (Nagpur Crime News) अवस्थेत आढळली होती. त्यामुळे हा हत्येचा प्रकार आहे की आत्महत्येचा, यासंदर्भात पोलीसही चक्रावून गेले होते. मृत बालाजी कल्याणे पोलीस भरतीची तयारी करत होता, तर त्याची मैत्रीण बीएएमएसची विद्यार्थिनी आहे. दोघे एकमेकांचे नातेवाईक होते आणि दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री होती अशी माहिती समोर आली आहे.(Nagpur Crime News)
Nagpur Crime News: बालाजीच्या शरीरावरील खोल जखमा
बालाजी याने रात्री उशिरा त्याच्यावर (मैत्रिणीवर) वार करत जीवे मारण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर स्वतः वर चाकूचे वार करून आत्महत्या केली असा जबाब बालाजीच्या मैत्रिणीने दिला होता. रात्री उशिरापर्यंत पोलीस तिची कसून चौकशी करत होते. दरम्यान बालाजीच्या शरीरावरील खोल जखमांमुळे त्याची हत्या तर करण्यात आली नाही ना असा दाट संशय पोलिसांना होता. त्यानंतर आता पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीदरम्यान सर्व सत्य समोर आलं आहे.(Nagpur Crime News)
Nagpur Crime News: रती देशमुख या मैत्रिणी विरोधात हत्येचा गुन्हा
बालाजी कल्याणे या 28 वर्षीय तरुणाची हत्याच झाली असून त्याच्या मैत्रिणीने त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी बालाजी कल्याणे याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी बालाजीची मैत्रीण आणि घटनेच्या वेळेला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या रती देशमुख या मैत्रिणी विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. हत्येच्या या घटनेमध्ये मैत्रिण रती देशमुख ही गंभीर जखमी झाली होती. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. म्हणून पोलिसांनी सध्या तरी तिला अटक केलेली नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे बालाजी कल्याणे पोलीस भरतीची तयारी करत होता. तर रती देशमुख शिक्षण घेत होती. दोघेही नांदेड जिल्ह्याचे रहिवाशी होते. दोघांमधील मैत्रीचे रूपांतरण प्रेमात झाल्यानंतर दोघांची लग्नाची तयारी होती. मात्र कुटुंबातून विरोध असल्याने दोघांमध्ये वाद ही व्हायचे.
Nagpur Crime News: बालाजीने तिच्यावर हल्ला केला आणि स्वतः आत्महत्या केली असा दिशाभूल करणारा दावा
त्याच तणावातून घटनेच्या दिवशी मध्यरात्रीनंतर दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातून रती देशमुखने धारदार चाकूने बालाजीवर हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात बालाजी खाली कोसळल्यानंतर घाबरलेल्या रती देशमुखने स्वतःवरही त्याच चाकूने वार करत स्वतःला जखमी केले आणि घटनेनंतर आरडाओरडा ऐकून धावून आलेल्यांना बालाजीने तिच्यावर हल्ला केला आणि स्वतः आत्महत्या केली असा दिशाभूल करणारा दावा केला, मात्र बालाजीच्या शरीरावरील खोल जखमांच्या अनुषंगाने त्याची हत्याच झाली असावी, असा प्राथमिक निष्कर्ष डॉक्टरांनी दिला. नंतर पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून तपास केलं आणि तपासात बालाजीची हत्या झाल्याचे समोर आले आहे.























