एक्स्प्लोर

निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरण | देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या सीजेएम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 15 हजाराच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला. 2014 च्या निवडणूक शपथपत्रात गुन्हे लपवल्याचा आरोप फडणवीस यांच्यावर आहे.

नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. नागपूर कोर्टाने देवेंद्र फडणवीस यांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 मार्च रोजी होणार आहे. दरम्यान, या सगळ्यामागे कोण आहे हे मला देखील माहित आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे लपवल्याचा आरोप अॅड. सतीश उके यांनी केला होता.

देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात 1996 आणि 1998 मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागपत्रांसर्भात गुन्हा दाखल केला होता. परंतु दोन्ही प्रकरणात आरोपांची निश्चिती झाली नव्हती. अॅड. सतीश उके यांच्या आरोपांनुसार, फडणवीसांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात या गुन्ह्यांची माहिती लपवली होती. अॅड. सतीश उके 2014 पासूनच देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढवत आहेत.

या मागे कोण आहे हे मला माहित आहे : देवेंद्र फडणवीस कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. "यामागे कोण आहे, हे मला माहित आहे, पण योग्य वेळी ते बाहेर येईल," असं फडणवीस म्हणाले. या खटल्याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, "ही केस 1995 -1998 च्या दरम्यान झोपडपट्टी हटवण्याच्या विरोधात आम्ही एक आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनातून काही केस आमच्यावर दाखल झाल्या होत्या. त्यात दोन खासगी तक्रारी माझ्याविरोधात होत्या. त्या तक्रारी आता संपल्या आहेत. मात्र 2014 च्या प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख केलेला नाही, अशाप्रकारचा गुन्हा माझ्याविरोधात दाखल करण्यात आला. मी कनिष्ठ कोर्टात ही केस जिंकलो. त्यानंतर सत्र न्यायालयाने आणि मग हायकोर्टात गेलो, तिथेही ही केस जिंकलो. ही केस सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाने ही केस पुन्हा कनिष्ठ कोर्टाकडे पाठवली. कनिष्ठ कोर्टाने आज मला हजर राहण्यासाठी समन्स बजावला होता. मी आज हजर राहिलो. मला वैयक्तिक जामीन मंजूर करुन पुढची तारीख दिली आहे. माझ्यावर कुठलीही वैयक्तिक केस नाही. ज्या केस होत्या त्या आंदोलनाच्या आहेत. मी सगळ्या केसेसचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला होता, त्यामुळे या दोन गुन्ह्यांचा उल्लेख करायचा नव्हता असं काहीही नव्हतं. वकिलांच्या सांगण्यानुसार प्रतिज्ञापत्र तयार झालं आहे. निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने खटले लपवणं असा कुठलाही हेतू नाही. मी 2014 आणि आता दोन्ही वेळी 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवून निवडून आलो आहे. मी सगळ्या गोष्टी कोर्टासमोर मांडेन आणि मला न्याय मिळेल याचा मला विश्वास आहे. कोर्टात केस कोर्टामध्ये असल्यामुळे फार काही बोलता येणार नाही. याच्या मागे कोण आहे हे मला देखील माहित आहे, पण योग्य वेळी ते बाहेर येईल."

काय आहे संपूर्ण प्रकरण? 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना, प्रतिज्ञापत्रात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याविरोधातील दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करत अॅड सतीश उके यांनी तक्रार दाखल केली होती. नंतर त्यांनी जेएमएफसी न्यायालयात याचिका ही दाखल केली होती. विशेष म्हणजे अॅड. सतीश उके यांनी दाखल केलेली ती याचिका तत्कालीन जेएमएफसी न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली होती. त्यानंतर अॅड. सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2019 मध्ये या प्रकरणावर प्राथमिक (कनिष्ठ) न्यायालयाने सुनावणी करावी, असा निर्णय दिल्यानंतर नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्या समक्ष 1 नोव्हेंबरपासून पुन्हा सुनावणीस सुरुवात झाली होती. सुनावणी दरम्यान न्यायालयाने नियमाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयात उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस जारी केली होती. त्याच आधारावर आज प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

संबंधित बातम्या

प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्याचे प्रकरण, देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर कोर्टाकडून समन्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lamborghini in Mantralaya : मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Pankaja Munde: 'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
Mutual Fund : एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Saif Ali Khan Attack : हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIPSaif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lamborghini in Mantralaya : मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Pankaja Munde: 'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
Mutual Fund : एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Saif Ali Khan Attack : हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
Nashik Politics : शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली, अखेर सैफ अली खानच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसलेच
मुंबई पोलिसांनी सैफच्या एरियातील एक-एक सीसीटीव्ही कॅमेरा तपासला अन् गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Nashik News : नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
Embed widget