एक्स्प्लोर
प्रियांका गांधींनी नागपुरातून निवडणूक लढवावी, राहुल गांधींना पत्र
नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु आहे. त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे, हे थांबवण्यासाठी प्रियांका गांधींनी नागपुरातून निवडणूक लढवावी, अशी मागणी नागपूर काँग्रेसचे प्रवक्ते संदेश सिंगलकर यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून केली आहे.
नागपूर : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरावं, अशी मागणी सातत्याने होत आहे. प्रियांका यांनी नागपुरातून निवडणूक लढवावी, अशी मागणी करणारं पत्र नागपूर काँग्रेसचे प्रवक्ते संदेश सिंगलकर यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना लिहिलं आहे.
नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु आहे. त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे, तर पक्ष कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे. चार वर्षांत गटबाजीत सुधारणा झाली नाही, अशी व्यथा सिंगलकरांनी मांडली आहे.
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला. 2019 च्या निवडणुकीत जनसमर्थनाचा फायदा उचलण्यासाठी प्रियांका गांधींनी नागपुरातून निवडणूक लढवावी, अशी विनंती सिंगलकरांनी पत्रामध्ये केली आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये आता पक्ष खिळखिळा झाला आहे. त्यामुळेच मागील निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. अशा परिस्थितीत पुन्हा काँग्रेसला भरारी घ्यायची असेल, तर प्रियांका गांधींनी इथून निवडणूक लढवणं गरजेचं असल्याचं सिंगलकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
प्रियांका गांधींना समर्थन देण्यासाठी सर्व गट एकत्र येतील, असा विश्वास सिंगलकरांनी व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement