Nagpur Bus Conductor Strike : नागपूरमध्ये आपली बससेवेतील कर्मचारी संपावर, नागरिकांची तारांबळ
महापालिकेच्या शहर परिवहन सेवेतील आपली बसची वाहतूक खोळंबली आहे.
Nagpur Conductor Strike : नागपूर शहर महापालिकेच्या 'आपली बस' (Nagpur Aapli Bus) सेवेतील सर्व कंडक्टर (वाहक) आज सकाळपासून संपावर गेले आहेत. वाहकांचा पगार झाला नसल्याने सर्व वाहक संपावर गेले आहे. त्यामुळे महापालिकेच्या शहर परिवहन सेवेतील आपली बसची वाहतूक खोळंबली आहे. यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.
वाहकांचा पगार वेळेवर का देत नाही?
नागपूर महापालिकेच्या आपली बस सेवेतील सर्व कंडक्टर (वाहक) आज सकाळपासून संपावर गेल्यामुळे शहरात बस सेवेचा खोळंबा झाला आहे. विद्यार्थ्यांसह नोकरदार वर्गाला अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महाविद्यालयात परीक्षा सुरु असल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. युनिटी security फोर्स या खाजगी कंपनीकडे आपली बससाठी वाहक नेमणुक करण्याची आणि त्यांच्या पगाराची जबाबदारी आहे. दरम्यान महापालिका आणि आपली बस सेवा चालवणाऱ्या खाजगी कंपन्या आपली बस सेवेतून मोठी कमाई करतात. मात्र, वाहकांचा पगार वेळेवर का देत नाही असा अनेक नागपुरकर यांचा सवाल आहे. दरम्यान बससेवा पूर्ववत करण्यासाठी महापालिकेच्या परिवहन समितीने ही प्रयत्न सुरू केले असून लवकरच तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. 'आपली बस' चे मुख्य डेपो असलेल्या मोरभवनमध्ये सर्व वाहक एकत्र आले असून, ते कामावर जायला तयार नाहीत. त्यामुळे शहर परिवहन सेवेतील बहुतांश बस उभ्याच आहेत.
विद्यार्थ्यांसह नोकरदार वर्गाची मोठी अडचण
नागपूर पालिका बससेवेतील कर्मचाऱ्यांच्या (वाहकांच्या) संपामुळे नागपूरकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. महापालिका बस सेवेच्या चालक वाहकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे आज सकाळी हाल झाले. कोरोनानंतर राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच अनेक ठिकाणी शाळा व महाविद्यालयेही सुरु झाली आहेत. अशातच बस सेवा बंद असल्याने नागपूरकरांना त्रासही सहन करावा लागतोय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- 'साथी राहुल गांधी, महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का?', भूमी अधिग्रहण कायद्यावरुन राजू शेट्टींचं पत्र
- Shiv Jayanti 2022 : शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे? माहिती आहे का? पहिल्या पुतळ्याच्या निर्मितीची रंजक कहाणी
- सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार प्रकरण; बारामती न्यायालयाकडून आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा