एक्स्प्लोर
पहाटेच्या सुमारास नागपुरात खासगी कंपनीत स्फोट, एकाचा मृत्यू तर सहा कामगार जखमी
नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील झुल्लर गावी एका खासगी कंपनीमध्ये आज पहाटे तीन वाजता स्फोट (Blast) झाल्याची घटना घडलीय. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झालाय.
Nagpur Company Blast News : नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील झुल्लर गावी एका खासगी कंपनीमध्ये आज पहाटे तीन वाजता स्फोट (Blast) झाल्याची घटना घडलीय. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू (Death of Worker) झाला आहे, तर इतर सहा कामगार जखमी झाले आहेत. श्री जी ब्लॉक या नावाच्या खासगी कंपनीत सिमेंटच्या मोठ्या वीट बनवण्याचे काम केले जाते. या कंपनीत ही घटना घडलीय. नंदकिशोर करंडे असं या मृतकाचे नाव आहे.
आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास मौदा तालुक्यातील झुल्लर गावी वीट बनवण्याच्या कारखान्यात अचानक स्फोट झाला. त्यामुळे कारखान्यासाठीचे टिन शेड खाली कोसळले आहे. या स्फोटात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सहा कामगार जखमी आहेत. गंभीर जखमींना उपचारासाठी नागपुरात हलवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! 14 वर्षीय विद्यार्थ्यानेच 3 शाळेत ई-मेल केला; बॉम्बस्फोटाचा बनाव उघडकीस आला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
शिक्षण
पुणे
Advertisement