एक्स्प्लोर

Nagpur Accident : ह्रदयद्रावक! सख्ख्या भावा बहिणीला टिप्परने चिरडले, संतप्त जमावाकडून टिप्परची जाळपोळ

Nagpur Accident : नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बिडगाव परिसरात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ज्यामध्ये कचरा उचलणाऱ्या भरधाव टिप्परने बहिण-भावाला चिरडत नेले आहे.

नागपूर :  नागपूरच्या (Nagpur) वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बिडगाव परिसरात एक ह्रदयद्रावक घटना घडलीआहे.  कचरा उचलणाऱ्या भरधाव टिप्परने बहिण-भावाला चिरडत नेले (Nagpur Accident) आहे. या घटनेमध्ये सख्या बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. या खळबळजनक घटनेनंतर बिडगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी जमलेल्या संतप्त जमावाने टिप्पर पेटवला. यावेळी पोलिसांचा (Nagpur Police) तगडा बंदोबस्त लावण्यात येऊन राज्य राखीव दलाच्या पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठवले आहेत. अंजली ननेलाल सैनी (वय 20) आणि सुमित ननेलाल सैनी (वय 16) असे या दोघा मृत बहिण भावाचे नावे असून ते बिडगाव येथील अंबेनगर येथील रहिवासी आहे. 

सख्ख्या बहिण-भावाचा जागीच मृत्यू

नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडेवाडी डम्पींग यार्ड आहे. या परिसरात कचरा उचलणाऱ्या टिप्पर आणि इतर अवजड वाहनांची सतत ये-जा सुरु असते. हा रास्ता कायम रहदारीचा असल्याने या रस्त्यावर सतत अपघाताच्या घटना घडत असतात. दरम्यान, आज 29 डिसेंबरच्या सकाळी दहा- साडे दहाच्या सुमारास अंजली सैनी आणि तिचा लहान भाऊ सुमित सैनी हे आपल्या दुचाकीने कामावर जात होते. सुमित हा गॅरेजमध्ये काम करत होता तर अंजली एका कॅफेत काम करत होती. दरम्यान रस्त्याने भरधाव येणाऱ्या टिप्परणे यांच्या वाहनाला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या टिप्परने या दोघांसह मोटर सायकला काही अंतर फरफटत नेले. ज्यामध्ये या दोघांचा जागीच मृत्यू झाला. 

संतप्त जमावाने केली दगदफेक, टिप्परही पेटवला 

घटना घडतांच नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली. त्यानंतर संतप्त जमावाने टिप्परला आग लावली. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. तोपर्यंत टिप्परला आग लागली होती. लागलेली आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आले. परंतु संतप्त नागरिकांनी अग्नीशमन दलावरही रोष व्यक्त केला. त्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सदर्शन, झोन चारचे उपायुक्त विजयकांत सागर आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जमाव संतप्त होत असल्याचे पाहून राज्य राखीव दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी संतप्त नागरिकांच्या गर्दीला पांगवले आणि परिस्थिति आटोक्यात आणली. त्यानंत पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलला रवाना केले आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Beed Case | कोणी धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही- फडणवीसGliding Center Vastav EP 120 | ग्लायडींग सेंटरच्या अडीच हजार कोटींच्या जागेच्या खाजगीकरणाचा प्रयत्नNitin Bikkad on Suresh Dhas:मी वाल्मिक कराडांना कधीच भेटलो नाही,बिक्कडांना फेटाळे सुरेश धसांचे आरोपAPMC Kesari Mango : 5 डझानाच्या पेटीला 15 हजारांचा भाव, APMCत आंब्याची पहिली पेटी दाखल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
Embed widget