एक्स्प्लोर
मायलेकीची हत्या करुन मृतदेहावर बलात्कार, सख्खा दीर अटकेत
प्रतिभा मुस्लीम असल्याने बिंड कुटुंबीय राकेश बिंड आणि प्रतिभा यांच्या लग्नामुळे नाराज होते, असं पोलीस तपासात उघड झालं आहे.

नागपूर : मायलेकीची हत्या करुन त्यांच्या मृतदेहावर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. आरोपी हा मृत महिलेचा सख्खा दीर आहे. तर मुलगी केवळ फक्त तीन वर्षांची होती. आरोपीला मोबाईलवर ब्लू फिल्म पाहण्याचं व्यसन होतं. वासनेच्या भरात हा प्रकार केल्याचं आरोपीने सांगितलं आहे.
प्रतिभा बिंड (वय 35 वर्ष) आणि त्यांची मुलगी रागिणी बिंड (वय 3 वर्ष) या 28 नोव्हेंबरच्या रात्री नागपूरच्या वडधामना परिसरातील राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या होत्या. या मायलेकीची हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं. घृणास्पद बाब म्हणजे दोघींची हत्या केल्यावर त्यांच्या मृतदेहावर बलात्कारही केला.
प्रतिभा मुस्लीम असल्याने बिंड कुटुंबीय राकेश बिंड आणि प्रतिभा यांच्या लग्नामुळे नाराज होते, असं पोलीस तपासात उघड झालं आहे. महिलेचा पती ट्रकचालक असून तो बाहेरगावी असताना 28 नोव्हेंबरला आरोपीने ठरवून ही हत्या केली. त्यानंतर वहिनीच आणि पुतणीच्या मृतदेहावर बलात्कार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी प्रतिभा यांचा दीर चंद्रशेखर बिंडला अटक केली आहे. चंद्रशेखरने डीफार्म केलं असून तो एका औषधाच्या दुकानात कामाला आहे. परंतु त्याला ब्लू फिल्म आणि पॉर्न साईट्स पाहायला आवडायचं. त्यामुळे तो कायमच वासनेच्या धुंदीत असायचा. त्यात त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
