एक्स्प्लोर

TCOC Operation | तीन महिने चालणारी नक्षलवाद्यांची 'टीसीओसी मोहीम' नेमकी काय असते?

'अबुझमाड' परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जो संघर्ष झाला तो नक्षलींच्या याच 'टक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन' म्हणजेच टीसीओसी दरम्यान झाले. जाणून घेऊया काय असते नक्षलवाद्यांची तीन महिने चालणारी 'टीसीओसी मोहीम'.

नागपूर : आजवर नक्षलवाद्यांच्या शहीद आठवड्याबद्दल बरेच काही ऐकले असेल. नक्षलवाद्यांकडून  पावसाळ्यात जुलै महिन्याच्या अखेरीस आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाळला जाणारा शहीद आठवडा नक्षली कारवायांसाठी चर्चेत असतो. मात्र, मार्च ते मे महिन्यादरम्यान तब्बल तीन महिने नक्षलवाद्यांकडून राबवले जाणारे 'टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन' म्हणजेच टीसीओसी पोलिसांसाठी शहीद आठवड्यापेक्षा कितीतरी जास्त आव्हानात्मक असते. कारण याच कालावधीत नक्षली पोलिसांवर सर्वाधिक हल्ले करण्याचा प्रयत्न करतात. तर पोलीसही याच कालावधीत नक्षलवादाच्या माध्यमातून देशाच्या व्यवस्थेविरोधात पुकारलेल्या सशस्त्र लढाईला चोख प्रतिउत्तर देतात.

नुकतंच महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांचा कोअर एरिया समजल्या जाणाऱ्या 'अबुझमाड' परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जो संघर्ष झाला तो नक्षलींच्या याच 'टक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन' म्हणजेच टीसीओसी दरम्यान झाले. जाणून घेऊया काय असते नक्षलवाद्यांची तीन महिने चालणारी 'टीसीओसी मोहीम'. 

देशात आणि महाराष्ट्रात नक्षलवाद घनदाट जंगल असलेल्या भागातच फोफावला असून इथेच नक्षली कारवाया पाहायला मिळतात. मात्र, पावसाळा आणि त्यानंतरचा काही महिन्यांचा कालावधी या घनदाट जंगलात कारवाया करण्यासाठी कठीण काळ असतो. त्या तुलनेत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस जेव्हा दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य भारतातील या भागात पानगळ सुरु होते तेव्हा जंगलात फक्त ये जा करणेच सोपे ठरत नाही तर या कालावधीत पानगळीमुळे जंगलात लांबपर्यंत पाहणे शक्य होते. त्यामुळे या कालावधीत नक्षलवाद्यांच्या विरोधात पोलिसांच्या कारवाया वाढतात आणि त्यालाच प्रतिउत्तर म्हणून नक्षलवाद्यांच्या हालचालीही वाढतात. पोलिसांच्या मूव्हमेंट्सवर नजर ठेऊन त्यांच्यावर जास्तीत जास्त हल्ले करण्यासाठी नक्षलवादी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत 'टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन' राबवतात.

या तीन महिन्याच्या कालावधीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये एक अघोषित युद्धच सुरु असते. पावसाळ्यात आपल्या सुरक्षित तळांवर आराम केल्यानंतर नक्षलवादी कमांडर्स त्या कालावधीत पोलिसांविरोधात तयार केलेल्या नियोजनाच्या आधारे फेब्रुवारीच्या अखेरीस पानगळ सुरु होताच सक्रिय होतात आणि मार्च महिन्यापासून पोलिसांविरोधात आक्रमक पद्धतीने कारवाया करुन त्यांचे जास्तीत जास्त नुकसान करता येईल या अनुषंगाने कारवाया करतात. त्यासाठी पोलिसांची रीतसर रेकी केली जाते, आपल्या खबऱ्यांमार्फत पोलिसांच्या हालचालीवर पाळत ठेवली जाते आणि नियोजनबद्ध पद्धतीने पोलीस आणि सुरक्षा दलांवर हल्ले केले जातात. 

गेल्या काही वर्षात पोलिसांवरील सर्वात भयावह हल्ले याच टीसीओसीच्या काळात झाले आहेत. 

- 15 मार्च 2007 रोजी दंतेवाडा येथील हल्ल्यात 15 पोलिस शहीद 
- 22 मे 2009 रोजी गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या नक्षली हल्ल्यात 16 पोलिस शहीद
- 6 एप्रिल 2010 दंतेवाडामधील भयावह हल्ल्यात केंद्रीय सुरक्षा दलाचे 75 जवान शहीद 
- 25 मे 2013 रोजी छत्तीसगडमधील सुकमा जवळ काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावरील नक्षली हल्ल्यात 25 जणांची हत्या 
- गेल्या काही वर्षात गडचिरोलीमधील मरकेगाव, हत्तीगोटा, मुरमुरीमधील घटना टीसीओसी दरम्यानच घडलेल्या आहेत   
- तर 1 मे 2019 रोजी गडचिरोलीच्या जांभुळखेडामधील भूसुरुंग स्फोटात 15 पोलीस शहीद झाले होते

या कालावधीत नक्षली अचानक सक्रिय का होतात?
नक्षल विरोधी पोलीस कारवायांचा प्रदीर्घ अनुभव असलेले सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांच्या मते, "मार्च ते मे दरम्यानच्या कालावधीचा वापर नक्षलवादी येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी आपली स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न असतात. गडचिरोली असो किंवा पलिकडच्या छत्तीसगडचा घनदाट अबुझमाडच्या भागात पावसाळ्यात आणि त्यानंतर काही आठवडे स्थानिक नद्यांमध्ये प्रचंड पाणी प्रवाह असतो. मात्र, फेब्रुवारीपासून इंद्रावती आणि तिला जंगलातून येऊन मिळणाऱ्या छोट्या नद्यांचा पाणी ओसरलेला असतो आणि याच कालावधीत छत्तीसगडमधील आपल्या सुरक्षित तळांवरुन महाराष्ट्रात प्रवेश करण्याचे नक्षलवाद्यांचे प्रयत्न असतात. या कालावधीत जंगलात पानगळ होते, किंबहुना झालेली असते. त्यामुळे जंगलात लांबपर्यंत नजर जाते, परिणामी नक्षलवाद्यांना लांबूनच पोलिसांवर लांबून नजर ठेवणे, त्यांच्या हालचाली वेळीच टिपणे सोपे ठरते आणि त्याचा फायदा घेत या कालावधीत पोलिसांवर जास्त आणि मोठे हल्ले करण्याचा त्यांचा प्रयत्न असते.

पोलिसांवरील हल्ल्यांशिवाय टीसीओसी काळात कोणत्या नक्षल कारवाया होतात?  
याच कालावधीत नक्षलवादी त्यांचा घात करणाऱ्या म्हणजेच त्यांच्या विरोधात पोलिसांना माहिती देणाऱ्या पोलिसांच्या खबऱ्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठीही आटापिटा करतात. त्यामुळे गावात येऊन पोलिसांचे खबरे असल्याचे आरोप ठेऊन अनेकांची नक्षलवाद्यांकडून हत्या होण्याच्या घटनाही याच कालावधीत घडतात. त्याशिवाय याच कालावधीत नक्षलवादी वनक्षेत्रात, त्याच्या अवतीभवती काम करणाऱ्या विविध कंत्राटदार, व्यावसायिक, उद्योग समूहांकडून खंडणी वसूल करण्याचे काम ही करतात. तेंदू पत्त्यांचे ठेकेदार असोत किंवा बांबू व लाकडाचे व्यापारी यांच्याकडून खंडणी घेण्याचे आणि ते देत नसल्यास त्यांच्या साहित्याची जाळपोळ केल्याच्या घटना या कालावधीत नक्षल्यांकडून घडवल्या जातात. तर याच कालावधीत नक्षलवादी रस्ते निर्माण करणाऱ्या कंत्राटदार, विविध कंपन्यांचे उत्खननाचे काम उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावतात. त्यामुळे कंत्राटदारांच्या ट्रक, रोडरोलर, जेसीबी, पोकलेंड सारख्या वाहनांची जाळपोळ करतात. शासनाचे लाकूड डेपो, बांबू डेपोना लक्ष्य बनवत जाळपोळ करण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न असतो.


TCOC Operation | तीन महिने चालणारी नक्षलवाद्यांची 'टीसीओसी मोहीम' नेमकी काय असते?

टीसीओसीला पोलिसांचं चोख प्रतिउत्तर असतं, यंदा तर सर्जिकल स्ट्राईक   
मार्च ते मे महिन्यादरम्यान नक्षलवाद्यांच्या टीसीओसी मोहिमेदरम्यान पोलीसही त्यांना चोख प्रतिउत्तर देतात. सतत अलर्ट राहून पोलीस नक्षलवाद्यांसंदर्भात सतत शोध मोहिमा राबवतात. या वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच गडचिरोलीमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी अशीच शोध मोहीम राबवली होती. गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाला शोध मोहिमेदरम्यान छत्तीसगड सीमेवरील कोपरशी जवळच्या जंगलात नक्षलवाद्यांचा तळ असल्याची माहिती मिळाली होती आणि त्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमेवर अबुझमाड परिसरात एका टेकडीवर असलेले नक्षलवाद्यांच्या त्या तळावर कारवाई केली. महाराष्ट्र पोलिसांच्या गडचिरोली रेंजचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्या मते दोन दिवसांच्या पोलिसांच्या मोहिमेत तीन वेळा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी होऊन गोळीबार झाले. मात्र, नक्षलवाद्यांची संख्या जास्त असतानाही पोलिसांनी त्यांचे ते तळ उद्ध्वस्तच केले नाही तर तिथे नक्षलवाद्यांचा एक छोटा शस्त्र कारखाना उद्ध्वस्त करत अनेक हत्यारही जप्त केले. नक्षलवाद्यांच्या या तळावर तीनशे लोकं राहून प्रशिक्षण घेऊ शकतील अशी सोय असल्याची माहिती संदीप पाटील यांनी दिली.

त्यामुळे जरी नक्षलवादी मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान त्यांचे "टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन" म्हणजेच टीसीओसी राबवून पोलिसांविरोधात कारवाया करत आले असले, तरी यंदा मोहिमेच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या कोअर एरियामध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत त्यांना जबर हादरा दिला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्यSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget