एक्स्प्लोर
गोंदियात बिबट्याची हत्या, चारही पायांचे पंजे कापून नेले
याआधी गोंदिया जिल्ह्यात वन्य जीव तस्करांनी विद्युत प्रवाह किंवा जाळे टाकून वन्य जीवांची शिकार केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र पहिल्यांदाच बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या झाल्याचं वनाधिकाऱ्यांनी सांगितलं.

गोंदिया : गोंदियात बिबट्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे शिकाऱ्याने मृत बिबट्याच्या पायाचे चारही पंजे कापून नेले.
गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या केळवद गावच्या मामा तलावाशेजारी मादी बिबट्या मृतावस्थेत आढळला. एका शेतकऱ्याने गोठणगाव वन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. बिबट्याच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीच्या खुणा आढळल्या. शवविच्छेदनात पोटातून दोन गोळ्या निघाल्या.
याआधी गोंदिया जिल्ह्यात वन्य जीव तस्करांनी विद्युत प्रवाह किंवा जाळे टाकून वन्य जीवांची शिकार केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र पहिल्यांदाच बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या झाल्याचं वनाधिकाऱ्यांनी सांगितलं.
वनाधिकारी श्वान पथकाच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात असून अवैधरित्या बंदुकी वापरणाऱ्या लोकांवर वन विभाग आणि वन्य जीव विभागाने कारवाई करावी, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सिंधुदुर्ग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज