एक्स्प्लोर
"माझ्याकडे पाहून का हसते?" जाब विचारत दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
नागपुरात तरुणाईचं हॉटस्पॉट असलेल्या फुटाळा तलाव चौपाटीवर 5 फेब्रुवारीला ही घटना घडली.

नागपूर : क्षुल्लक कारण हाणामारी झाल्याचं आपण आजवर अनेकदा पाहिलं असेल. अशाच एका क्षुल्लक कारणामुळे नागपुरात तरुणींमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. माझ्याकडे पाहून का हसते?", या क्षुल्लक कारणावरुन तरुणींमध्ये हाणामारी झाली आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नागपुरात तरुणाईचं हॉटस्पॉट असलेल्या फुटाळा तलाव चौपाटीवर 5 फेब्रुवारीला ही घटना घडली. तरुण-तरुणींचा एक ग्रुप चौपाटीवर बसला असता, त्यावेळी तिथे दुसरा ग्रुप आला. आपल्याकडे बघून हसते या कारणावरुन थोड्यावेळाने दोन तरुणींमध्ये वाद झाला. वाद एवढा टोकाला गेला की या तरुणींमध्ये भर चौपाटीवर हाणामारी झाली.
इतरांनी यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही या तरुणी काही जुमानत नव्हत्या. तरुणींनी एकमेकांना अर्वाच्य आणि अश्लील शिवीगाळही केली. काही वेळाने या तरुणी तिथून निघून गेल्या, मात्र उपस्थितांपैकी कोणीतरी त्यांच्या हाणामारीचा व्हिडीओ तयार केला.
पोलिसांपर्यंत घटनेची माहिती पोहोचल्यावर गिट्टीखदान पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत दोन्ही गटांची ओळख पटल्यानंतर घटनेत सहभागी असलेल्या तरुण-तरुणींना पालकांसह पोलीस स्टेशनमध्ये बोलावून समज देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी कलम 149 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
नवी मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
























