एक्स्प्लोर

माजी केंद्रीय मंत्री उमा भारती सरसंघचालक आणि संघाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीला

आज उमा भारती यांनी नागपूर गाठून ज्येष्ठ संघ नेत्यांची भेट घेत आशीर्वाद घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, त्यानंतर मध्यप्रदेशात परतण्यापूर्वी उमा भारती यांनी संघाचे ज्येष्ठ नेते मा गो वैद्य आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली.

नागपूर : भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी आज दुपारी संघ मुख्यालय नागपूर येथे सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर ज्येष्ठ संघ नेत्यांची भेट घेतली. सकाळी महाल परिसरातील संघ मुख्यालयात दाखल झालेल्या उमा भारती तब्बल 5 तास तिथे होत्या. विशेष म्हणजे यावेळी सरसंघचालक मोहन भागवत ही नागपुरात संघ मुख्यालयात उपस्थित होते. उमा भारती काल रात्री उशीरा नागपुरात दाखल झाल्या होत्या. रात्री रवी भवन सर्किट हाऊसमध्ये थांबल्यानंतर सकाळी त्या संघ मुख्यालयात दाखल झाल्या आणि दुपारपर्यंत तिथेच होत्या.

संघ वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार राजकारणासह मध्यप्रदेशात सत्तांतरानंतर नुकतंच झालेले मंत्रिमंडळ विस्तार अशा विविध विषयांवर उमा भारती यांची संघ नेतृत्वाशी चर्चा झाली. दरम्यान उमा भारती यांच्या नागपूर दौऱ्याचा मुख्य हेतू गुरू पौर्णिमेचा उत्सव आणि संघ नेत्यांचा आशीर्वाद घेणे, असे असल्याचे संघ सूत्रांनी सांगितले आहे. नुकतंच गुरू पौर्णिमा होऊन गेली असून संघाच्या सहा महत्वाच्या उत्सवामध्ये गुरू पौर्णिमेच्या उत्सवाला अनन्यसाधारण महत्व असते. तुलनेने युवा स्वयंसेवकांनी संघातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन संस्थेला मदत स्वरूपात गुरूदक्षिणा देणे, असे या गुरूपौर्णिमा उत्सवाचे स्वरूप असते.

त्या निमित्ताने राजकारण, समाजकारणासह विविध क्षेत्रात कितीही मोठ्या पदावर गेलेले स्वयंसेवक संस्थेला गुरूदक्षिणा देतात. दरवर्षी गुरुपौर्णिमेला नागपूरात येऊन ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणाऱ्या उमा भारती यावर्षी गुरु पौर्णिमेला नागपूरात येऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे आज उमा भारती यांनी नागपूर गाठून ज्येष्ठ संघ नेत्यांची भेट घेत आशीर्वाद घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, त्यानंतर मध्यप्रदेशात परतण्यापूर्वी उमा भारती यांनी संघाचे ज्येष्ठ नेते मा गो वैद्य आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Buffalo Attack : कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू
कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Nagpur HSC Paper Leak Case : नागपूरच्या बारावी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; बोर्डाच्या परीक्षेपूर्वीच शिकवणी वर्गाच्या सराव परीक्षेत 'ती'च प्रश्नपत्रिका?
नागपूरच्या बारावी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; बोर्डाच्या परीक्षेपूर्वीच शिकवणी वर्गाच्या सराव परीक्षेत 'ती'च प्रश्नपत्रिका?
Womens Day 2026 Special Story : वाघाशी दोन हात, जे कुणालाच जमलं नाही ते 'ति'नं करून दाखवलं! आक्रमक वाघाला जेरबंद करणारी पहिली महिला डॉक्टर
वाघाशी दोन हात, जे कुणालाच जमलं नाही ते 'ति'नं करून दाखवलं! आक्रमक वाघाला जेरबंद करणारी पहिली महिला डॉक्टर

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Embed widget