नागपूर जिल्ह्यात दिव्यांग अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर बळजबरीने गर्भपात
नागपूर जिल्ह्यातील एका दिव्यांग अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करुन ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा बळजबरीने गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली. गर्भपाताच्या कामात आरोपीला मदत करणारी परिचारिका आणि प्रकरण दाबण्यासाठी मदत करणारी पीडीतेची आई सहआरोपी आहेत.
नागपूर : जिल्ह्यातील काटोलमध्ये एका दिव्यांग अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा बळजबरीने गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेचा मुख्य आरोपी मुलगी शिक्षणासाठी राहत असलेल्या वस्तीगृहातचा अधीक्षक आहे. गर्भपाताच्या कामात तिला मदत करणारी परिचारिका आणि प्रकरण दाबण्यासाठी मदत करणारी पीडीतेची आई सहआरोपी आहे. या प्रकरणात 14 वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित मुलगी शिक्षणासाठी काटोलमध्ये एका खासगी संस्थेच्या वसतिगृहात राहत होती. त्याच वसतिगृहाचा अधीक्षक राजेंद्र काळबांडे वय (44 वर्ष) याने दिव्यांग मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन मार्च महिन्यापासून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. कोणाला काहीही सांगितल्यास वसतिगृहातून काढण्याची धमकी दिली. सततच्या या अत्याचारांमुळे पीडित मुलीला गर्भधारणा झाली. मार्चच्या अखेरीस लॉकडाऊन लागल्याने वसतिगृह रिकामे करण्यात आले तेव्हा पीडित मुलगी तिच्या घरी परत गेली. काही दिवसांनी तिच्या आईला ही बाब माहीत पडली. त्यांनतर पीडित मुलीच्या आईने मुलीकडे विचारपूस केली असता वसतिगृह अधीक्षक राजेंद्र काळबांडेने तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केले असल्याची बाब तिने आईला सांगितली.
नागपुरात तरुणाच्या आत्महत्येवरुन राजकारण; अॅट्रोसिटीसह हत्येचा गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी
पीडितेच्या आईला आर्थिक मदत देण्याचे आमिष पीडित मुलीच्या आईने या संदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने तिला देखील धमकावून पीडितेचा गर्भपात करून घेण्यासाठी दबाव टाकला. मुलीच्या आईला आर्थिक मदत देण्याचे आमिष देत आरोपी राजेंद्र काळबांडे याने एका खासगी रुग्णालयात कधीकाळी काम केलेल्या एका परिचारिकेला सोबत घेत पीडित मुलीचा गर्भपात घडवून आणला. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने भ्रूण/गर्भ जमिनीत पुरला. ही बाब पीडितेच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी राजेंद्र काळबांडे याच्या सह गर्भपाताच्या कामात मदत करणारी परिचारिका आणि पीडित मुलीची आई या तिघांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी राजेंद्र काळबांडेला बलात्कार आणि बाल लैंगिक प्रतिबंध कायद्यान्वये अटक केली असून दोन्ही महिलांना ही कटात सहभागी होत अवैधरित्या गर्भपात केल्याच्या आरोपात टक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
Mission Begin Again | आजपासून मिशन बिगिन अगेन, मुंबई, नागपूर, नाशिकमध्ये खबरदारी घेत दुकानं सुरु