विमानात तांत्रिक बिघाड, 135 प्रवाशांचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग
Emergency landing at Nagpur : बंगळुरु-पाटणा गो एअरवेजच्या विमानाचे तांत्रिक बिघाडामुळे नागपूर विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत लँडीग करावे लागले आहे.
नागपूर : बंगळुरुवरुन पाटणाला (Bengaluru-Patna) जाणाऱ्या गो फर्स्ट एअरवेजच्या (GoAir flight) विमानामध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे त्याचे नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) आपत्कालीन परिस्थितीत लँडीग करावे लागले आहे. विशेष म्हणजे यावेळी विमानात चालक दलासह 135 प्रवाशी प्रवास करत होते. या सर्वांना घेऊन या विमानाचे आपात्कालीन लँडिग (Emergency landing) करण्यात आले आहे. सुदैवाने सर्वजण सुखरुप असल्याचंही समोर आलं आहे.
Bengaluru-Patna GoAir flight with 139 passengers & crew members on board makes an emergency land at Nagpur airport due to technical glitch, as per Abhid Ruhi, an official of Nagpur airport
— ANI (@ANI) November 27, 2021">
मिळालेल्या माहितीनुसार गो फर्स्ट एअरवेजचं प्रवासी विमान बंगळुरुवरुन पाटणाला जात होते. यावेळी विमानाच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान नागपूरच्या दिशेने वळवण्यात आले. ज्यानंतर नागपूर विमानतळावर सुरक्षेचा उपाय म्हणून विमानाचे आपात्कालीन लँडिग करण्यात आले.
प्रवाशांसाठी संध्याकाळी खास विमान
विमानातील सर्व प्रवाशांना नागपूर विमानतळावर उतरवण्यात आल्यानंतर तिथेच त्यांना अल्पोपहार देण्यात आला आहे. तसंच त्यांना पाटणाला जाण्यासाठी सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी एक खास विमान सोडण्यात येणार आहे. तसंच विमानाचं सध्या अभियांत्रिकी टीमकडून विमानाची तपासणी करण्यात येत आहे.
हे ही वाचा
- Nagpur Update : नागपूर पोलिसांचा हवाला व्यवसाय करणाऱ्यांविरोधात सर्जिकल स्ट्राइक, 84 लाखांची रोकड जप्त
- दुर्देवी! दिंडीत पिकअप घुसला, तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू, 24 जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना
- Omicron covid new variant : नव्या व्हेरिएंटचा धोका किती, उपाय काय? A टू Z माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha