नागपुरात अश्लिल चाळे करणाऱ्या जोडप्याला हटकल्याने डॉक्टरला गावगुंडांची मारहाण
नागपुरात महिलेच्या हत्येची घटना ताजी असताना आता ज्येष्ठ नागरिक असलेल्या डॉक्टरला गाव गुंडांनी मारहाण केली आहे. मंदिराजवळ अश्लिल चाळे करणाऱ्या जोडप्याला हटकल्याने ही मारहाण झाली आहे. या घटनेने नागपूरची बहुचर्चित कायदा सुव्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले आहेत.
नागपूर : नागपुरात एका ज्येष्ठ नागरिक असलेल्या डॉक्टरवर गाव गुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या दत्तात्रय नगर परिसरात 26 जूनच्या संध्याकाळी हल्ल्याची ही घटना घडली. या हल्ल्यामागचं कारण म्हणजे मंदिराजवळ अश्लील चाळे करणाऱ्या एका जोडप्याला हटकले. परिसरातील नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे डॉ. ज्ञानेश ढाकुलकर यांचा जीव तर वाचला आहे. मात्र, नुकतंच उपराजधानीत एका महिलेची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना ताजी असताना आता एका ज्येष्ठ नागरिकाला गाव गुंडांनी उच्चभ्रू वस्तीत येऊन सर्वांच्या उपस्थितीत बेदम मारहाण केल्याने नागपूरची बहुचर्चित कायदा सुव्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले आहेत.
नागपूरच्या दत्तात्रय नगरमध्ये राहणारे डॉ. ज्ञानेश ढाकुलकर यांनी 25 जूनच्या संध्याकाळी घरी परत येताना परिसरातील सर्वेश्वर मंदिराच्या जवळ उभे राहून अश्लील चाळे करणाऱ्या एका जोडप्याला हटकले होते. (डॉक्टर स्वतः त्या मंदिराचे विश्वस्त आहेत) मात्र, रहिवाशी वस्तीतल्या मंदिराजवळ उभे राहून असभ्य वागणूक करू नका असे समजावून सांगणाऱ्या डॉक्टरांना जोडप्यामधील तरुणाने पाहून घेण्याची धमकी देत तेव्हा तर तिथून पळ काढला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी अनेक गाव गुंडाना घेऊन तो तरुण दत्तात्रय नगर परिसरात ज्ञानेश ढाकुलकर यांचा शोध घेऊ लागला. त्यामुळे घाबरलेल्या डॉक्टरांनी वस्तीतील काही नागरिकांना सोबत घेऊन सक्करदरा पोलीस स्टेशन गाठून आदल्या दिवशीच्या घटनेसंदर्भात पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंदविला आणि संध्याकाळी पोलीस निरीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांच्या समस्यां जाणून घेतल्या.
गृहमंत्र्यांच्या नागपुरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे; रस्त्यावर पळवत महिलेची हत्या
सोसायटित घुसून डॉक्टरांना मारहाण पोलीस अधिकारी यांची घटना स्थळावरुन पाठ फिरताच गाव गुंडांची टोळी तिथे पोहोचली आणि पोलिसांना आमची तक्रार देतो म्हणून डॉ. ज्ञानेश ढाकुलकर यांच्यावर हल्ला चढवला. गाव गुंडांच्या हल्ल्यात 60 वर्षांचे डॉक्टर खाली कोसळले. गुंड डॉक्टर ढाकुलकर यांना जीवे मारतील त्याच्या आधीच सुदैवाने जवळच उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यामुळे गुंडांची टोळी पळाल्याने डॉक्टर ढाकुलकर यांचा जीव वाचला. मात्र, या घटनेनंतर उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या दत्तात्रय नगर परिसरात भीतीचे वातावरण असून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी परिसरात पोलिसांची उपस्थिती वाढवण्याची आणि वस्तीत शिरुन धुडघूस घालणाऱ्या गाव गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. या घटनेत पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींसह एकूण सात आरपीना ताब्यात घेत कारवाई सुरू केली आहे.
Death Body found in ATM Nagpur | नागपूर शहरात इन्ड्सइंड बँकेच्या एटीएममध्ये गूढ मृत्यू