एक्स्प्लोर

Devendra Fadanvis : तर राज्यातील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा 

Devendra Fadanvis : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस सुरु असून विधानपरिषदेत कांद्यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.  

नागपूर : जर गरज पडली आणि शेतकऱ्यांना अडचणी आल्या तर राज्यांतील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार असल्याची घोषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सभागृहात केली आहे. राज्यातील कांद्याची निर्यातबंदी झाल्यानंतर व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये उद्रेक झाला. त्यानंतर विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांना या मुद्द्यावर चांगलच घेरलं. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी कांदा लिलाव संदर्भात प्रश्न यावेळी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली. 

कांद्याला चांगला भाव मिळत असतानाच 31 मार्चपर्यंत कांद्याची निर्यातबंदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्याचा निषेध संपूर्ण राज्यभर करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्यांचे लिलाव बंद ठेवण्यात आले होते. पंरतु सहकार विभागाने जर सलग तीन दिवस कांद्याचे लिलाव बंद ठेवले तर परवाना रद्द करणार असल्याचं जाहीर केलं, त्यानंतर पुन्हा एकदा बाजार समित्यांमध्ये कांद्यांचे लिलाव सुरु झाले. 

अंबादास दानवेंनी काय म्हटलं?

अवकाळीचा मोठ्या प्रमाणावर फटका हा बळीराजाला बसला. कांद्याच्या संबंधित केंद्र सरकारने जे निर्यातबंदीचे धोरण लागू केल्यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कोंडी झाली. कांद्याचा दर 4 हजारांवर गेला असताना निर्यातबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे कांद्याचे दर कोसळले. कांद्याचे दर आता दीड हजारांवर गेले आहेत. केंद्र सरकार याविषयी कोणती भूमिका मांडणार असा सवाल यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. 

देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं?

मी पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की, जेव्हा आपल्या देशात कांदा जास्त प्रमाणात असतो तेव्हा आपण निर्यातबंदीची परवानगी देतो. पण आता देशामध्येच कांदा 25 ते 30 टक्के कमी आहे. देशातच कांदा उत्पादन कमी झालं आहे. त्यामुळे निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. सध्या यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. पण गरज पडली आणि शेतकऱ्यांना अडचणी आल्या तर राज्यांतील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

सहकार विभागाच्या निर्देशांनतर कांदा लिलाव सुरु

सलग तीन दिवस कांदा लिलाव बंद ठेवले तर परवाना रद्द करण्यता येईल असे निर्देश सहकार विभागाकडून देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी पुन्हा कांद्यांचे लिलाव सुरु केलेत. सर्व जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव बंद झाल्यानंतर सहकार विभागने सर्व जिल्ह्यांच्या स्तरावर हा निर्णय घेतला होता. त्यातच नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याचे व्यवहार बंद असल्याचे निरीक्षण सहकार विभागाने नोंदवले होते. 

हेही वाचा :

Nashik News : लिलाव पुन्हा सुरु झाले पण कांद्याचे भाव घसरले, बळीराजा पुन्हा चिंतेत

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! नागपुरात जुन्या वादातून तरुणाला संपवलं, 11 अल्पवयीन आरोपींना अटक
धक्कादायक! नागपुरात जुन्या वादातून तरुणाला संपवलं, 11 अल्पवयीन आरोपींना अटक
Vidarbha Heat: विदर्भात उन्हाचा तीव्र तडाखा; अकोला ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर, उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
सूर्य कोपला! विदर्भात उन्हाचा तीव्र तडाखा; अकोला ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर, उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी डॉक्टरांमधील करुणा अन् प्रामाणिकपणा महत्त्वाचा; राष्ट्रपती मुर्मूंचा सल्ला
वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी डॉक्टरांमधील करुणा अन् प्रामाणिकपणा महत्त्वाचा; राष्ट्रपती मुर्मूंचा सल्ला
Nagpur Congress : पक्षविरोधी नेत्यांची भेट अन् सोबत चिकन पार्टी केल्याचा आरोप; नवसंजीवनी देण्याऐवजी नागपुरात नव्या वादाच कारण ठरलंय 'काँग्रेस संघटन सृजन अभियान
पक्षविरोधी नेत्यांची भेट अन् सोबत चिकन पार्टी केल्याचा आरोप; नवसंजीवनी देण्याऐवजी नागपुरात नव्या वादाच कारण ठरलंय 'काँग्रेस संघटन सृजन अभियान

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget